सावळेश्वर :- प्रतिनिधी.
मारोतराव रावते.
शेतकऱ्यांना शेती करत असताना माती,पाणी व हवामान या गोष्टी अनमोल आहेत. या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांनी शेती चे नियोजन करावे. शेतीवरच शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून असल्यामुळे शेतकर्यांनी शेती करताना या गोष्टीवर लक्ष देऊन शेती करावी जेणेकरून आपली प्रगती व आर्थिक उन्नती होईल.
पावसाचे संकेत
मान्सूनचा पाऊस कधी होणार त्यासंदर्भातील अचूक माहिती देण्यासाठी नैसर्गिक इंडिकेटर यांचा अभ्यास करावा. माणसापेक्षा कोकीळ कोकिळा पक्षाच्या जोडीचे भविष्यातील पावसाचा अंदाज घेऊन घरटे बांधतात. घरटे उंच असेल तर पाऊस कमी आणि मध्यभागी असेल तर पाऊस जास्त असे पक्षाचे घरटे असतात.मुंग्यांनी उंच वारूळ बांधले असेल तर पाऊस जास्त होणार. शेतात काम करत असताना वाटोळे सुटत असेल तर आभाळ येणार...! आणि पाऊस होणार. रात्री लाईट जवळ जर जास्त किडे येत असतील तर पाऊस येणार. दिवसभर भरपूर तापमानात वाढ झाली असेल तर पाऊस येणार. 15 मे ते 30 मे दरम्यान आपल्या भागात थोडा जरी पावसाच्या सरी आल्या तर पेरणी जूनमध्ये होणार असे संकेत पाऊस येण्यास संदर्भात वर्तविले आहेत.
पाऊस उघडीप देणारं संकेत
पाऊस उघड देणार असेल तर कसे ओळखावे उभे वारे सुटत असेल तर पावसात खंड पडतो बावीस दिवस ते ३३दिवस किंवा त्रेचाळीस ४३ दिवस. 11 जूनला सूर्याभोवती खळे पडले तर पाऊस उघड देणार. सारखी वारे सुटत असेल आणि पिंपळ वृक्ष भळभळ वाजत असेल तर उघडीप देणार. शेतातील झाडावर जाळी तयार होत असेल तर पाऊस आठ दिवसांमध्ये निघून जाणार समजावे.
गारपीट संदर्भात संकेत
गारपीट संदर्भात माहिती देताना श्री पाटील म्हणाले की 15 मार्च ते 10 एप्रिल या काळात गारपीट होते. खडकाळ जमिनीमध्ये गारपीट होते. त्याकरिता हरभरा गहू रब्बी हंगामाची पेरणी जमेल तेवढ्या लवकर करावी.कारण आपले पीक गारपीट मध्ये सापडणार नाही.
विजा संदर्भात संकेत
विजा संदर्भात माहिती देताना विजांचा कडकडाट होत असेल तर शेतात व बाहेर कुठे थांबू नये. सरळ घराचा रस्ता धरावा अन्यथा आपण जिथे असाल तिथे कुठल्याही झाडाखाली न थांबता एखादा खोल खड्डा बघून खोलगट भागांमध्ये उभे न राहता खाली बसून डोके पायामध्ये ठेवून बसावे. कारण उंच ठिकाणावर विजा पडत असतात.
गावातील मंदिरावरील कळसा मध्ये कॉपर धातू असल्यामुळे गावाच्या एक किलो मीटर परिघामध्ये विजा पडत नाहीत. सध्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत पंप भेट भेटत आहेत. त्यामुळे सौर पंप पॅनल चे वीज पडून नुसकान होऊ नये म्हणून अर्थिंग मध्ये कॉपर टाकून टावर उभा करत आहेत. त्यामुळे तेथील परिसरात वीज पडत नाही असे प्रतिपादन चातारी येथील परिसंवाद चर्चेमध्ये श्री पंजाब डख पाटील यांनी केले.
शेतकरी समस्या आणि परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजक स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित जिल्हाध्यक्ष श्री अनिल किसनराव माने,कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव ना. माने,प्रमुख उपस्थिती तालुका कृषी अधिकारी श्री श्रीरंग लिंबाळकर साहेब,विजय हा मंद कृषी सहाय्यक, निम्मतवाड साहेब,श्रीधर देवसरकर,बाबुराव कदम, भगवान माने (माजी सरपंच) अश्विन वि. माने, अरविंद माने, नारायण दे. माने, अचल पतंगे स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित उपाध्यक्ष उमरखेड, सखाराम पाटील बोरीकर स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित पक्ष उमरखेड तालुका अध्यक्ष, परिसरातील पंचक्रोशीतील शेतकरी व गावातील नागरिक उपस्थित होते.

0 टिप्पण्या