प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी ते बिटरगाव हा आठ किलोमीटरचा रस्ता अतिशय खड्डेमय झाल्याने नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घ्यावा लागत आहे . मागील दोन वर्षापासून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले. दोन वर्षांमध्ये पाच ते सहा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे ढुंकूनही पहात नव्हते. ढाणकी शहराची व परिसरातील नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी असलेले पोलीस बांधव यांचे पोलीस स्टेशनं बिटरगाव येथे आहे. परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची तक्रार द्यायची असेल तर थेट बिटरगाव गाठावे लागत आहे. मात्र घराब रस्त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटनाचे स्थळ म्हणून ओळखले जाणारे पैनगंगा अभयारण्य आणि सहस्त्रकुंड धबधबा पाहण्याकरिता पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात
पर्यटकांच्या भरोशावर अनेक नागरिकांनी आपले व्यवसाय थाटले असून त्यांच्या कुटुंबाचा गाडा यामुळे चालतो परंतु ढाणकी बिटरगाव हा रस्ता अत्यंत खड्डेमय असल्याने पर्यटक या मार्गाने न येता हिमायतनगर मार्गे जात असल्या असल्याचे दिसून येत आहे खड्डेमय रस्त्यांमुळे पर्यटकांच्या भरोशावर उभारलेल्या व्यवसायाला कुलूप लावण्याची वेळ आली असून ही मोठी शोकांतिका आहे. बंदी भागातील नागरिकांना आरोग्याकरिता रात्री-अपरात्री ढाणकी येथे येताना मोठ्या प्रमाणात आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास होत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे बंदी भागातून गरोदर महिला येते वेळेस अनेक महिलांनी रस्त्याच्या कडेला बाळांना जन्म दिला असल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. या खड्डेमय रस्त्यातून ढाणकी व परिसरातील नागरिकांची सुटका व्हावी याकरिता मनसे तालुकाध्यक्ष शेख सादिक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सदर रस्ता सात दिवसाच्या आत करावा अन्यथा ढाणकी बिटरगाव रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला तसेच खड्डेमय रस्त्यांमुळे आपला जीव गमवावा लागलेल्या नागरिकाच्या कुटुंबाच्या सर्व सदस्याचा पालनपोषणाचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने उचलावा अशी मागणी मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष डेव्हिड शहाणे उमरखेड तालुका अध्यक्ष शेख सादिक मुकुंद जोशी हिरासिंग चव्हाण प्रविण भिमटे सिद्धार्थ अरे राजू पिटलेवाड संजय बिजुरी यासह इतरही मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
ढाणकी बिटरगाव रस्ता हॉट मिस करण्यासाठी निधी उपलब्ध आहे पावसाळ्यामुळे हॉट मिक्स चे काम करता येत नाही त्याकरिता रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मुरूम आणि गिट्टी मिक्स करून खड्डे बुजवण्यात येत आहे.
जुगल जाधव अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
ढाणकी बिटरगाव रास्ता त्वरित खडे मुक्त करण्यासाठी आम्ही पाच दिवसाचा अवधी संबंधित विभागाला दिला आहे त्याची दखल घेण्यात आली नसल्यास ढाणकी बिटरगाव रस्त्यावर चका जाम आंदोलन करण्यात येईल.
देवा शिवरामवर
मनसे जिल्हा आध्येक्ष यवतमाळ

0 टिप्पण्या