ढाणकी प्रतिनिधी -
जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने बाराव्या वर्गामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत विणकरे होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले कि आमच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी जीवनातील सर्वात मोठ्या टर्निंग पॉइंट मध्ये यशस्वी कामगिरी केल्या चे समाधान आम्हाला लाभले आहे. ढाणकी शहरामध्ये आठ ते दहा शाळा अस्तित्वात आहेत, परंतु एकाही शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले नाही, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. असेच विद्यार्थी दरवर्षी नवीन मिळत राहो आणि आपल्या शाळेचे तसेच गावाचे नाव उज्वल करावे भविष्यात या विद्यार्थ्यांनी मोठा ऑफिसर होऊन शाळेमध्ये भेट द्यावी अशी इच्छा व्यक्त केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका जवळेकर मॅडम यांनी आपल्या मनोगतातून यश मिळवणे फार कठीण असते आणि ते टिकवणे त्याहीपेक्षा कठीण असते जीवनात यशस्वी झाल्यानंतर आपले पाय जमिनीवर ठेवले तर निश्चितच त्याचा फायदा समाजाला सुद्धा होतो. येणाऱ्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांना पूर्वीचे वैभव निश्चितच प्राप्त होतील आज इंग्रजी माध्यमांची भूत प्रत्येक पालकाच्या डोक्यात शिरल्याचे दिसत आहे. आज इंग्रजी माध्यमातील अनेक पालकांनी आपल्या मुलांना आमच्या शाळेमध्य प्रवेश घेत आहे. हे सर्व तुमच्या सारखे विद्यार्थी आमच्या हातून घडत असल्याचे फळ आहे विध्यार्थी चा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष अशोक मोरे, समाधान राऊत, घनश्याम मुनेश्वर उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना मयूर सुरोशे आणी रोहिणी मुनेश्वर यांनी आपल्या यशाचे श्रय शिक्षक वर्ग आई वडील यांना देत गुरुजन वर्गाने सांगितलेल्या मार्गाने जात ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करू
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कुंबरवार आभार प्रदर्शन काळे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्या करीता राठोड सर बचाटे सर पालपवाड मैडम यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या