आरोग्य अधिकाऱ्या साठी जिल्हा अधिकारांना साकडे , काँग्रेस जिल्हा सरचिटणीस यांनी तात्काळ नियुक्ती ची केली मागणी. -LOKमानस



फुलसावंगी प्रतिनिधी-

संजय जाधव

येथील मुखयालयी राहत नसलेल्या आरोग्य अधिकाऱ्याला तात्काळ फुलसावंगी येथील मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागनी तसलीम शेख यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना केली आहे.

       येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही महिन्या पासून दोन आरोग्य अधिकाऱ्या पैकी एक महागाव वरून ये;जा करीत आहेत या दोघांना ही समान दिवस सेवेचे वाटून दिले आहे.मात्र महागाव वरून ये-जा करणारे डॉक्टर त्यांची दिवसाची डिवटी संपली की ते हल्ली मुक्काम असलेले महागाव गाठतात .यामुळे त्याच्या सेवेत रात्रीला आलेले रुग्णांना गैरे सोई चा सामना करावा लागत आहे. ही गैरे सोय टाळण्यासाठी दोन्ही डॉक्टर मुखयालयी असणे अतिशय गरजेचे आहे.म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक चे जिल्हा सरचिटणीस तसलीम शेख यांनी थेट जिल्हा अधिकाऱ्यांना या बाबतीत ऑनलाइन तक्रार केली आहे.या तक्रारीत सदर डॉक्टर ला तातळीने किंवा त्यांच्या बदल्यात डॉक्टर चे कायमस्वरूपी मुख्यालयी राहतील अशी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या