पोलीस सुस्त, मटका मस्त, अनेकांची कुटुंब उद्धवस्त.

 

दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी 

मो -9921572936

हिमायतनगर तालुक्यातील गोर गरिबांच्या जीवनासीखेळ खेळला जाणारा मटका नावाच्या खेळाने केवळ स्थानिक पोलीसांच्या सुस्त व लालची वृती मुळे तालुक्यातील अनेक गावात जाळे विणले असुन या मटका नावाच्या खेळा मुळे आनेक संसार उघड्यावर येऊन उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र हिमायतनगर तालुक्यात   दिसत आहे. 

  हिमायतनगर तालुका तसा पाहीला तर वाडी, तांडा आदिवासी बहुल वस्ती असलेला भाग आहे. या भागात शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग,मजुरी करून आपली उपजिविका करतात.तालुक्यातील  पोटा( बु), सोनारी फाटा,खैरगाव, कामारी, कांडली  या गावासह शहरात मटका नावाच्या जुगार खेळाणे आपले पाय खोलवर रुजवली असल्याने सर्वसामान्य वर्ग या जुगाराच्या खेळात पुरता अडकल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत. हि बाब सर्वसामान्य माणसांच्या नजरेला दिसत असली तरी पोलीसांच्या नजरेला का? दिसत नसेल हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. स्थानिक पोलीसांच्या नजरेला न दिसणारी बाब  गुन्हे अन्वेषण विभागासह  कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक साहेबांना दिसेल काय?. आशी सर्व सामान्य जनतेत चर्चा होताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या