हिमायतनगर प्रतिनिधी- दाऊ गाडगेवाड
हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर येथे दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रभू महादजी पिटलेवाड व त्यांचे चिरंजीव रामेश्वर प्रभू पिटलेवाड यांनी बनविलेल्या स्वर्ग वैकुंठ रथाचा लोकार्पण सोहळा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर साहेब व ह भ प माधव महाराज बोरगडीकर, यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला . या प्रसंगी बोलतांना उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर साहेब यांनी असे सांगितले की खरोखरच प्रभू पिटलेवाड यांनी तयार केलेल्या वैकुंठ रथाचे काम खूप कौतुकास्पद आहे असेच कार्य समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्तेच्या हातून नेहमी घडत जाओ अशी श्रावण महिन्याच्या पवित्र एकादशी निमित्त परमेश्वर चरणी प्रार्थना केली यावेळी हा वैकुंठ रथ तयार करणारे प्रभू महादेवजी पिटलेवाड यांचा भाजपा हिमायतनगर तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित ह भ प माधव महाराज बोरगडीकर, ह.भ.प.बापू महाराज आंदेगावकर, ह.भ.प.बापूराव महाराज ,अक्कलवाड गुरुजी, भाजपा तालुका अध्यक्ष आशिष सकवान,शिवसेना उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, युवा सेना तालुकाप्रमुख विशाल राठोड , भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, किरण भाऊ बीच्चेवार,प्रभू कल्याणकर ,बालाजी राठोड ,प्रकाश जाधव गणेश कोरडे, दत्ता कोंनकेवाड, कंठाळे गुरुजी ,प्रदीप देशपांडे, रामराव सुर्यवंशी ,अनंत देवकते ,केशव चौरे, गजानन हारडपकर, संतोष पुठेवाड , धम्मा वाढवे, संतोष साबळकर सह आदि भर्मिक व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार होते
0 टिप्पण्या