दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर
शहरातील नेहरूनगर भागातील जुनी विहिर बुजवून त्यावर अनाधिकृत ताबा करून पक्के बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली होती. उपरोक्त कारवाई करण्यास टाळाटाळ झाल्यामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून मराठा समराज्यसंघ महाराट्र राज्य हिमायतनगर यांच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे. उपोषणाला तीन दिवस पुर्ण आहे.
हिमायतनगर येथील नेहरूनगर भागातील नागरिक, महिला मंडळीने सामूहिक रित्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , नांदेड किनवट राज्य रस्त्यालगत असलेली नागरिकांच्या वापरातील विहीर नांदेड ते किनवट राज्य रस्त्याचे कंत्राट घेतलेल्या गुत्तेदाराने अकारण बुजवली आहे. सध्याला या महामार्गाचे काम चालू आहे.सदरील रोडचे खोदकाम करून निघालेली माती नेहरूनगर येथील मालमत्ता क्रमांक 317 या नागरिकांच्या वापरात असलेल्या सार्वजनिक विहिरीत टाकून ती विहीर बुजवली आहे. सदरील विहीर हे नेहरूनगर येथील नागरिकांच्या वापरण्याचा एकमेव जलस्रोत असल्याने भविष्यात नागरिकांची वाताहत होणार आहे. त्या मुळे सार्वजनिक मालमत्तेवर टाच आणणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करावी, या मागणीसाठी मराठा समराज्य संघ ता.अध्यक्ष मुन्ना शिंदे 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करीत आहेत. उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणाला पाठीबा म्हणुन आज शेकडो महीला घांगर घेऊन उपोषणस्थळी पोहचल्या यामध्ये लक्ष्मीबाई गडमवार , जयश्री खंदारे, कमल माने, कांताबाई कदम, बायनाबाई गायकवाड, गीताबाई बुरकूंडवाड, अनिता सुरभेवाड, सुनिता शेळके, सरस्वतीबाई शेळके, सुनिता वाघमारे, पार्वताबाई खंदारे, लक्ष्मीबाई ढोणे, कॅदलवाड मॅडम, शेख. मेमूना शेड. अमिर , प्रयागबाई नाईकवाड आदिं महिला, व पुरुषाचा सहभाग आहे.

0 टिप्पण्या