हिमायतनगर प्रतिनिधी - दाऊ गाडगेवाड
मो -9921572936
हिमायतनगर शहरातील पळसपूर रोडवर दानपत्राद्वारे उपलब्ध झालेल्या जागेत दासरी- माला दासरी समाजाच्या भावांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी परमेश्वर मंदिर ट्रस्टचे संचालक अनिल मादसवार याना दिले. ते त्यांच्या कार्यालयात भेट दिल्यानंतर अनिल मादसवार यांनी समाजाच्या भवनांचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली असता जवळगावकर बोलत होते.
दासरी- माला दासरी समाजाचे भूषण राजेश मादसवार यांनी स्व.नरसिंग नरहरी मादसवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजमंदिरासाठी ३० बाय ४० ची जागा दानपत्राद्वारे दिली असून, या ठिकाणी समाजातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमासाठी उपलब्ध झालेल्या जागेत भव्य समाजमंदिर उभारण्यासाठी समाजचे जेष्ठ नेते मुरहरी यंगलवार, पांडुरंग सादूलवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांनी हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे निधीची मागणी केली आहे.
लवकरच यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आ.जवळगावकर यांनी दिले. यावेळी जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार, दत्ता शिराने, शुद्धोधन हनवते, सोपान बोम्पिलवार, धम्मा मुनेश्वर, अनिल नाईक, सुभाष राठोड, डॉ.प्रकाश वानखेडे, गणेशराव शिंदे, सूर्यवंशी सर, संजय माने, शे रहीम पटेल, बाकी सेठ, गोविंद बंडेवार, संजय पेन्शनवार, संतोष शिंदे, साईनाथ पालदेवार, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या