दराटी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडव यांचा निरोप समारंभ

 


उमरखेड तालुका प्रतिनिधी:-मारोती गव्हाळे 

उमरखेड तालुक्यातील पोलीस स्टेशन दराठी मध्ये  एक विनम्र आणि संयमी अधिकारी म्हणून ओळख असलेले सपोनि मा. गोविंदराव पांडव साहेब यांची अकोला पोलीस स्टेशन येथे बदली झाल्याने त्यांना  पोलीस पाटील संघटनेतर्फे आणि परिसरातील गावपुढारी, लहान मोठे कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष श्री अमोल दूमारे, पोलीस पाटील अमडापूर यांनी केले. ज्यात त्यांनी साहेबांच्या एकंदर कारकिर्दीवर आणि कार्यशैलीवर प्रकाश टाकला. पोलीस पाटील आणि ठाणे अधिकारी यांच्यात योग्य समन्वय असल्यावर स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीवर नियंत्रण कशाप्रकारे मिळवता येते याचे उत्तम उदाहरण म्हणून साहेबांची जागा आमच्या मनात कायम राहील असे  मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर पत्रकार श्री नंदू जाधव यांनी पत्रकारांच्या वतीने बोलताना सकारात्मक बातम्या लावून साहेबांच्या विधायक कार्याप्रति सहकार्याची भावना जोपासल्याचे प्रतिपादन केले.आणि कोरटा येथील तंटामुक्ती अध्यक्ष श्री विश्वनाथ खराटे यांनी सुद्धा अल्पावधीत जनसामान्यांचे मनामध्ये साहेबांनी निर्माण केलेली त्यांची उज्ज्वल प्रतिमा सर्वांसमोर उजागर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि शेवटी पोलीस स्टेशन दराटी येथील पीएसआय श्री भोसले सर यांनी आभार प्रदर्शन केले. व नंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला पत्रकारांसह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मंडळी, psi भोसले साहेब, psi अमोल राठोड यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी आणि दराटी,खरबी,  कुरळी, भवानी, आमडापुर, बोरगाव, थेरडी,सोइट, वालतुर, असे स्टेशन हद्दीतील 22 गावातील पोलीस पाटील हजर होते. अतिशय साध्या पण शिस्तबद्ध रीतीने हा निरोप समारंभ सोहळा पोलीस स्टेशन दराटी येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा. ठाणेदार साहेबांसह सारेच भावुक होतांना दिसत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या