दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामिण भागातील रस्त्यांचा प्रश्न स्वातंत्र्यापासुन आजपर्यंत चिंतेचा विषयच बनलेला आहे. या भागातील आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी ग्रामिण भागातील सामान्य नागरीकांचा केवळ मतदानापुरताच वापर केला असल्याचे आजची परिस्थिती पाहुन लक्षात येते, हे सर्वात मोठ ग्रामिण भागातील नागरीक, शेतकरी वर्गाच दुर्भाग्यचं म्हणावं लागेल.
देशात सगळीकडे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे पण हिमायतनगर तालुक्यातील शिरपल्ली येथील नागरीकांना आपले हक्क मिळवण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चक्क उपोषणाला बसावे लागले. याचे कारण शिरपल्ली ते गाजेगाव येथील बंधाऱ्यापर्यंत २ कि.मी. चा रस्ता विदर्भाला जाण्यासठी व शेताकडे जाण्यासाठी शेतकरी सदरील रस्त्याचा वापर करतात. पण जुलै महिण्यात सलग ३ दिवस झालेल्या पावसाने हा शेतकऱ्यांनी स्वखर्चातून खडीकरण केलेला रस्ता वाहुन गेल्याने ये-जा करणे अवघड बनले आहे, त्यामुळे शिरपल्ली येथील नागरीकांनी ह्या रस्त्याचे मजबुतीकरण करून दुरूस्ती करण्याची मागणी तहसिलदार यांच्याकडे केली होती. तसेच खासदार, आमदार, साहेबांबरोबर जिल्हा परीषदेकडेही रस्ता करण्याची मागणी केली होती. पण याची कोणीही दखल घेतली नसल्याने शिरपल्ली येथील नागरीक स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीचं तहसिल कार्यालया समोर अमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे कसे म्हणता येईल ग्रामिण भागातील नागरीक, शेतकरी वर्ग स्वातंत्र्य झाला आहे.
लोकप्रतीनिधीनी शिरपल्ली येथील नागरीकांची, शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन रस्त्याचे मजबुतीकरण करून हा रस्ता वाहतुकीसाठी साईस्कर करावा असे झाले तर शिरपल्ली, शेलोड्यासह ईतर काही गावांना विदर्भातील बाजारपेठेला जाण्यासाठी सोईस्कर होईल. तसेच हिमायतनगर, डोल्हारी, पळसपुर, सिरपल्ली मार्गे बस सेवाही चालू होईल यातुन शासनालाही लाखो रूपयाचा महसूल मिळेल त्यामुळे हा रस्ता जेवढ्या लवकर होईल त्या वेळेत मजबुतीकरण करून द्यावा या मागणीसाठी शिरपल्ली येथील शेतकरी अमरण उपोषणाला तहसिल कार्यालय हिमायतनगर येथे बसले आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांच्या उदासिनपणामुळेच ग्रामिण भागातील रस्त्यांची बिकट अवस्था पहावयास मिळत आहे. शिरपल्ली ते गांजेगाव पुलापर्यंत २ कि.मी. पर्यंत पावसाच्या पाण्याने वाहुन गेलेल्या रस्त्यासंबंधी राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांशी व खासदार, आमदार यांच्याशी बोलून तात्काळ मजबुतीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे यांनी शिरपल्ली येथील नागरीकांशी उपोषणाला बसलेल्या ठिकाणी भेट देऊन आश्वासन दिले आहे.

0 टिप्पण्या