कारला पी. ग्रामपंचायतीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते महा अभियान सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मान.

 


दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी

कारला पिचोंडी ग्रामपंचायत च्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेची कामे वेळेत पूर्ण करून तालुक्यात द्वितीय क्रमांकावर जिल्हा स्तरीय  सर्वोत्कष्ठ महा अभियान पुरस्काराने सन्मान मिळवला असून स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी बालाजी पोगुलवाड व सरपंच गजानन कदम यांचा ट्रॉफी व प्रशस्ति पत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.   

       कारला पिचोंडी ग्रामपंचायत ने गावात विविध विकास कामांना सुरुवात केली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या जवळपास 140 घरकुल बांधकाम पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.गट विकास अधिकारी सुधिर माजंरमकर  ग्रामविकास अधिकारी बालाजी पोगुलवाड यांनी कारला ग्रामपंचायत कडे विशेष लक्ष देऊन गोरगरिबांना घरकुल बांधकाम करण्यास मदत केली. 

नवनिर्वाचित ग्रामपंचायत येताच विकास कामे देखील वेगाने होत असून शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक विहीरीचे काम तालुक्यात प्रथम पुर्ण केले आहे. या विहिरीला भरमसाठ पाणी लागल्याने गावचा कायमचा पाणी प्रश्न सुटला आहे.

जिल्हा परिषदेकडून महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून कारला पिचोंडी ग्रामपंचायत चा तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला या पुरस्काराने स्वातंत्र्य दिनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अबुंलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, गटविकास अधिकारी माजंरमकर, यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी बालाजी पोगुलवाड, सरपंच गजानन पाटील कदम, उपसरपंच रोशन धनवे यांना देऊन सन्मान करण्यात आला आहे. कारला येथील नवनिर्वाचित सरपंच सदस्यांच्या कामाचे कौतुक आ.माधवराव पाटील जवळगावकर, सभापती सुरेखा आडे, सुभाष राठोड, परमेश्वर गोपतवाड, शे.रफिक भाई, प्रा. ज्ञानेश्वर घोडगे,डॉ.गफार,सदस्य सोपान बोंपीलवार, दत्ता चितंलवाड, गजानन मिराशे, रामेश्वर यमजलवाड, रामा मिराशे, सुरेश चपलवाड,वसंत मिराशे,लक्ष्मण चितंलवाड, श्रीराम मुठेवाड, बाबाराव डवरे, पिटेश कदम, अगंद  सुरोशे, आनंद रासमाड ,शिवाजी एटलेवाड,नाथा चवरे ,जिवन रावते, यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या