दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी
मराठवाड्यातील नागरीकांना गेल्या कित्येक वर्षापासून पिण्याचे पाणी, सांडपाणी, शेतीच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे त्यासाठी वर्षानुवर्षे उपोषणाला बसावे लागत आहे. कधी तहसिल कार्यालयासमोर, कधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, कधी चक्क नदीपात्रातही उपोषणाला बसावे लागत आहे. उन्हाळ्यात तर रानोरान, डोंगरदऱ्याने महिला, पुरूषांना, मुला बाळांना भटकावे लागते तरीही आजपर्यंत मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या भागातील लोकप्रतिनिधींना सोडवता आलेला नाही.
पिण्याचे, सांडपाण्याचे पाणी ज्या काही विहीरी खोदलेल्या आहेत त्यातुन नागरीक आपली तहान भागवतात. पण काही असेही लोक आहेत जे कि सामान्य नागरीकांच्या उपयोगाचे पाणी नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचीच प्रचिती नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर एक तालुका आहे. त्या हिमायतनगर शहरातील नेहरूनगर येथील महामार्गालगत नेहरूनगर वार्ड क्रं. ९ मधील नागरीकांच्या सांडपात्राटदाराद्वारे प्रयत्न चालू आहे.
हिमायतनगर शहरातील नांदेड-किनवट महामार्गालगत नेहरूनण्याच्या उपयोगाची असलेली विहीर बुजवण्याचा कंगर येथील. वार्ड क्रं. ९ मध्ये सार्वजनिक विहीर असून त्या विहीरीतील पाणी नेहरूनगर येथील नागरीकांसाठी एकमेव जलस्त्रोत आहे. त्या जल कुंडातुन नागरीक पाण्याचा वापर करतात पण महामार्गाच्या रस्त्याचे काम चालू असल्याने तेथील खोदकामातून निघालेली माती संबंधीत कंत्राटदाराने विहीरीत टाकल्याने विहीर बुजल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधी हिमायतनगर नगरपंचायतीकडे तक्रार केली असता नगरपंचायतीने कुठलीही कार्यवाही केली नसल्याने त्यांची चौकशी करण्यात यावी यासाठी तहसिल कार्यालय येथे नेहरूनगर येथील माधव शिंदे हा युवक अमरण उपोषणाला बसला आहे.
आपल्या देशाने ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला परंतु हिमायतनगर येथील घटनेने मोठ्या व्यक्तीने पाण्याचे स्वातंत्र्यही हिरावुन घेत असल्याचे दिसून येत आहे यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी युवकाला उपोषणाला बसावे लागते ही सर्वात मोठी शोकांतीका म्हणावी लागेल.
कोरोना विषाणुने आदीच देशातील नागरीकाचे जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. शेतकऱ्यांचेही स्वातंत्र्य हिरावून घेतल्या जात असतानाच जलस्त्रोत असलेल्या पाण्याच्या विहीरी बुजवून नागरीकांना वणवण भटकंती करावी लागण्यास भाग पाडत असल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे. आता शासनानेच ठरवावे कि, नागरीकांना कशा कशासाठी संघर्ष करायचा आहे ते कारण सामान्य नागरीक या अशा प्रकारामुळे हतबल झाले आहेत. पाण्याची विहीर बुजवल्या जाते तरीही या भागाचे नेतत्व करत असलेले लोकप्रतीनिधी मौन बाळगणेच योग्य असल्याचे मानत आहेत.
नेहरूनगर येथील विहीर का बुजवली यासंबंधी हिमायतनगर नगरपंचायत कंत्राटदारांवर कुठलीही कार्यवाही करत नाही त्यामुळे त्यांची चौकशी करून विहीर बुजवण्यला जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी आणि नागरीकांना एकमेव जलस्त्रोत असलेली विहीर नागरीकांसाठी खुली करून देण्यात यावी यासाठी नेहरूनगर येथील माधव शिंदे हा युवक बाबाराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर येथील तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसला आहे. त्यामुळे शासनाने नागरीकांची समस्या जाणून ती दुर करावी व पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच उपोषणाला अनेकांचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

0 टिप्पण्या