तालुका कृषि अधिकारी सुडे साहेबांना निरोप समारंभ.

 


दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 

हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना जवळचे वाटणारे हिमायतनगर तालुका पंचायत समिती कृषि अधिकारी सुडे साहेबांना सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांची शेती निरोप समारंभ घेण्यात आला होता. 

       कृषि अधिकारी लहाणे साहेबांची बदली हदगाव येथे झाल्यानंतर त्याच्या जागी सुडे साहेबांची तालुका कृषि अधिकारी पदी नियुक्ती झाली होती. गेल्या सहा ते सात वर्षात सुडे साहेबांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या नियोजन पद्धतीने सोडवल्या. हिमायतनगर तालुक्यात नेहमीच सिंचनाचा उद्भवत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी सतत झगडावे लागत आहे तो सिंचनाचा प्रश्न शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनांमधुन विहीरी मंजुर करून देऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानी या योजने अंतर्गत जवळपास ३५० विहीरी मंजुर करून दिल्या त्यामुळे जवळपास ९०० हेक्टरच्या आसपास जमिनीचे क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास हातभार लावला.  तसेच अनेक ईतर योजनांचा शेतकऱ्यांना सुडे साहेबांनी लाभ मिळवून दिला. आता त्यांची बदली लातूर जिल्ह्यात झाल्याने डोल्हारी येथील लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांचा सत्कार करून निरोप दिला. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश राऊत यांनी केले. तर सुत्रसंचालन आनंद खिल्लारे यांनी केले. यावेळी ता. कृषि अधिकारी माने साहेब,  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, बापुराव माने, अरविंद माने, तुकाराम माने, माजी सरपंच रमेश कदम, माजी सरपंच बळीराम राऊत, माजी सभापती दिलीप साळवे, सतोष पाटिल, साहेबराव कदम, देवराव माने, अमोल कांबळे, राजु राऊत,  प्रकाश तुळसे, देवानंद भालेराव व डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन विहीरीचे लाभार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या