पाच हजार द्या अन घरकुल घ्या, अकोली ग्रामपंचायत मधील प्रकार.

 

तालुका प्रतिनिधी :- मारोती गव्हाळे 

उमरखेड तालुक्यातील अकोली ग्रामपंचायत मध्ये सध्या पाच हजार द्या आणि घरकुल घ्या,अशी योजना चालु असल्याची चर्चा आहे. 

देशात सर्वाना घर मिळावे, विनाघरकुल कोणीही राहू नये, या उद्देशाने शासनाने घरकुल योजना काढली.  ज्या नागरिकांचे पक्के घर नाही अश्या दारिद्र रेषेच्या खालच्या लोकांना घर बांधण्यासाठी शासन अनुदान स्वरूपात रक्कम देते.मात्र या योजनेचे अकोली येथे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.  गावातील ग्रामपंचायत सदस्य संगनमंताने घरकुल लाभार्थी कडून ५००० रुपये द्या तुमचे घरकुल मंजूर करून देतो. असे म्हणत असल्याची चर्चा सुरु आहे. अश्या बऱ्याच

कोणत्याही शासकीय योजना  राबवण्यात बरोब्बर येत नाही. किंवा अधिकारी व पदाधिकारी मिळून त्या योजनेचे तीन तेरा वाजवतात.  असाच प्रकार आता घरकुल योजनेत अकोली येथे पाहावयास मिळत आहे.  या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य गरीब नागरिकांचे मरण दिसून येत आहे.त्यामध्यें घरकुल ची योजना घेण्यासाठी ५००० हजार रुपये कोठून आणायचे?? हा मोठा प्रश्न आहे.  तरी या सर्व प्रकारची चौकशी करून गरिबांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या या ग्रामपंचायत चे सदस्य यांची चौकशी करण्याची मागणी येथील समस्त नागरिक करत आहे. व ही होणारी लूट थांबावि अशी गावकरी वर्गात चर्चा आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या