कारला जि. प.शाळेच्या व्य. स.अध्यक्ष पदी उत्तम कांबळे उपाध्यक्ष पदी शिवाजी एटलेवाड यांची बिनविरोध निवड.



दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी

कारला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी उत्तम कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवाजी एटलेवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

       कारला येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत येताच गावातील सर्व समित्यांची निवड करण्यात येत असून कृषी समिती , महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. 

त्याचप्रमाणे शुक्रवारी जिल्हा परिषद शाळेत पालक सभा बोलाऊन सरपंच गजानन पाटील कदम यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्यवस्थापन समिती बिनविरोध करण्यात आली आहे. अध्यक्षपदी उत्तम कांबळे, उपाध्यक्षपदी शिवाजी एटलेवाड  व शिक्षकतज्ञ म्हणून प्रा. डि.डि.घोडगे व सदस्यांची निवड करण्यात आली आहे.या निवड समितीचे मुख्याध्यापक बुरकुले ,  तंटामुक्त समिती अध्यक्ष डॉ. गफार, ग्रा.पं.सदस्य दत्ता चिंतलवाड, पत्रकार सोपान बोंपीलवार, सुनील घोडगे, सुरेश चपलवाड,गजानन कदम, तुकाराम कदम, नाथा चवरे, नागसेन गोखले, जिवन रावते, नागोराव गोणेवाड, कैलास कांबळे, अगंद सुरोशे, आनंद रासमवाड, राजेश ढाणके, संतोष गुफंलवाड,साहेबराव घोडगे, 

सौ. गोकुर्णा कांबळे,सौ.दुर्गा मोरे,रामदास इटेवाड, लक्ष्मण ढाणके, आक्षय मोरे, यांच्या सह पालकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या