शेतकरी दिन व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील जयंतीच्या निमित्ताने 15 शाखेच्या नामफलक अनावरण व उद्घाटन सोहळा . शेतकरी मार्गदर्शन शिबिर.

 


खासदार सुजयदादा विखे पाटील, सत्यपाल महाराज, पंजाबराव डंख पाटील यांची उपस्थिती राहणार.


दाऊ गाडगेवाड हिमायतनगर

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व शेतकरी दिनाचे औचित्य साधून हदगाव तालुक्यात 15 शाखेच्या नामफलकाचे अनावरण व शाखा उद्घाटन सोहळा खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील प्रख्यात समाजसुधारक सत्यपाल महाराज यांची सत्यपालची सत्यवाणी व प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डंख पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद हदगाव तालुक्याच्या वतीने देण्यात आली आहे.


दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी दिन व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे, कृषी विभाग व विद्यापीठातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करणार आहेत उपस्थित शेतकरी बांधवांना फवारणी सुरक्षेसाठी सुरक्षा किट मोफत देण्यात येणार आहे महाराष्ट्रातील प्रख्यात समाजप्रबोधनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा सत्यपालची वाणी, प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक पाटील यांच्या मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे, हदगाव तालुक्यातील पाथरड, उमरी, जहागीर, वायपणा खुर्द, वायपना बुद्रुक, येवली, आष्टी, लिंगापूर, वाळकी बुद्रुक, वाळकी खुर्द, धानोरा,शिवणी, कोळगाव कंजारा,तळेगाव, धोत्रा या गावात पहिल्या टप्यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या 15 शाखेच्या उद्घाटनाचा सोहळा व नामफलकाचे अनावरण महाराष्ट्रातील लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील व प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती भगवानराव कदम,विलासराव माने,अविनाश कदम,शेख रहीम, गजानन कंठाले, सतिष शिंदे,योगेश पवार,सतीश जाधव,ज्ञानेश्वर सुर्यवंशी, नितीन वानखेडे, सुनील ताकतोडे, अनिल देवसरकर,आकाश कवडे,विक्रम क्षीरसागर यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या