अरे बाप रे, पैनगंगा अभयारण्यात आढळले "भुताचे झाड"

 

ढाणकी प्रतिनिधी -

काल पर्यावरण दिनानिमित्त ढाणकी वृक्षप्रेमी व नितनाम फाउंडेशन च्या वतीने पैनगंगा अभयारण्यात जंगल सफारी करण्यात आली होती.  अभयारण्यात भटकंती करत असताना वनविभागा तर्फे विविध वृक्षाची व प्राण्याची माहिती देण्यात येत होती. जंगलात वावरताना कळू चे झाड गाईड ने दाखवले.  या झाडाला भुताचे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते.  रात्रीच्या वेळी हा वृक्ष चमकत असल्याने इतर वृक्षा पेक्षा वेगळा दिसतो त्यामुळे यावर काहीतरी भुताटकी झाल्यासारखे वाटते त्यामुळे ग्रामीण भागात या झाडाला भुताचे झाड म्हणून ओळखले जाते. या झाडावर ग्रामीण भागात भूत असल्याचा समज असतो.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या