बंदिभागातील मतदार संघातील मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देवून ते लवकरात लवकर कसे मार्गी लागतील, याकडे लक्ष -- आमदार नामदेव ससाने.-LOK मानस



[ प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, उमरखेड यांनी दिले आमदार व तहसीलदार यांना निवेदन]

 ढाणकी प्रतिनिधी -

      ढाणकी ते बिटरगाव या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. व या रस्त्याने पायी चालणे सुद्धा अवघड झाले असून या रस्त्यावर अपघाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, मागील चार महिन्यात  5 ते 6 अपघातामध्ये मृत्युमुखी पडले आहे.

       विशेष म्हणजे या महिन्यात, सहस्रकुंड पर्यटनस्थळी पर्यटकांची वाढती गर्दी पाहता,  वाहनांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. तरी या रस्त्यावरून अपघात होण्याचे संभावना दिसून येत आहे. हा एकमेव मार्ग सर्व गावांना जोडणारा दुवा आहे.

        या मार्गावरील वाहतूक, जवळपास 40 गावांना जोडणारी आहे.  यावेळी  तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना निवेदन देण्यात आले.यावर तहसीलदार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करु असे आश्वासन दिले.तसेच उमरखेड विधानसभाचे आमदार नामदेव ससाने यांना निवेदन दिले व त्यांनी फोन वरून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना रस्त्याची सध्याच्या परिस्थितीत मुरुमीकरण करून घ्या.जेने करून पावसाळ्यात या रस्त्यावर अनुचित प्रकार घडू नये असे आदेश दिले.व  बंदिभागातील गावातील रस्ते नव्याने डांबरीकरण कामे मंजूर करण्यात आली असून पावसाळ्या अभावी ही कामे रखडली आहेत.तरी या भागातील गावातील नागरिकांच्या विकास कामाकडे जातीने लक्ष देऊन,व मतदार संघात जास्तीत जास्त विकासकामे करून सिध्द करून सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन आमदार नामदेव ससाने यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बिटरगाव रस्ता पूर्णत्वास न्यावा अशी मागणी,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड तालुका यांच्या वतीने निवेदनाच्या मार्फत करण्यात आली.

         त्यावेळी उपस्थित पदाधिकारी अनिल राठोड(जिल्हा अध्यक्ष) सविता चंद्रे (राज्य महिला अध्यक्ष) मारुती गव्हाळे (तालुकाध्यक्ष) ,तालुका उपाध्यक्ष सुनील ठाकरे, तालुका सचिव कमलाकर दुलेवाड,गजानन वानखडे,विवेक जळके, मैनोद्दीन सौदागर,गजानन नावडे, हरिदास इंगोलकर, नयूम शेख, बाबा खान,शैलेश कोरडे हे सर्व उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या