ढाणकी स्मशानभूमीत हायमास्ट फोकस लाईट चे उदघाटन.- हल्लाबोल न्यूज


ढाणकी प्रतिनिधी -

ढाणकी स्मशानभूमी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती वसंतराव उर्फ बाळासाहेब चंद्रे पाटील यांच्या हस्ते हायमास्ट लाईट चे उत्तघाटन करण्यात आले. 

 राज्यसभा खासदार यांना भेटून बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी ढाणकी शहराकरिता विकास निधी ची मागणी केली होती.  खासदार विकास महात्मे यांनी खासदार निधीतून धनगर वाडीत हायमास्ट  लाईट मंजूर झाला होता. परंतु ढाणकी शहरात धनगर वस्ती तुटक तुटक असल्याने कोणत्या ठिकाणी लाईट लावावा याची चर्चा बाळू पाटील यांनी  समाज बांधवा सोबत केली.  परंतु एक मत होतं नसल्याने याची माहिती ढाणकी स्माशनभूमीचे अध्यक्ष सुभाषबाबू कुचेरीया, नितीन येरावार, आमोल तुपेकर,अतुल येरावार यांना लागताच त्यांनी बाळू पाटील यांना भेटून धनगर वाडी करीता आलेला हायमास्ट  लाईट जर स्मशान भूमी मध्ये बसवला तर त्याचा फायदा सर्वाना होईल असे सांगितले. बाळू पाटील यांनी ही त्वरित धनगर वाडी करीता आलेला लाईट ढाणकी स्मशान भूमीत बसवण्या करीता संमती दर्शवली. ढाणकी शहरातील स्मशान भूमी म्हणजे एक प्रकारे बगीचा सारखा केल्यामुळे शहरातील नागरिक सकाळ,संध्याकाळी फिरण्या साठी व व्यायाम करण्यासाठी  तेथे जात असतात, हायमास्ट  लाईट बसवल्या मुळे संपूर्ण स्मशानभूमी लखलख प्रकाशात न्हाऊन निघाल्याने  शहरवासीयांनी तसेच स्मशान भूमी समितीने बाळू पाटील यांचे आभार व्यक्त करत हायमस्क लाईट चे उदघाटन शुक्रवारला पार पडले.  यावेळी सुभाष बाबू कुचेरीया,नगरसेवक रमेश पराते,भाजपा शहर अध्यक्ष  रोहित वर्मा,काँग्रेस शहर अध्यक्ष  अमोल तुपेकर,नितीन येरावार,नगरसेवक संबोधी गायकवाड, सुभाष गायकवाड,किशोर ठाकूर,वसंता फुलकोंडवर,संभाजी गोरटकर,पत्रकार उदय पुंडे व नागरिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या