ढाणकीत कोविड सेंटर उभारणी साठी गुरुजींचा मदतीचा हात. 90 हजार रुपये केले जमा.



ढाणकी प्रतिनिधी 

कोरोना रोगाने ढाणकी सह परिसरात शिरकाव केल्याने अनेक नागरिकाला आपला जीव गमवावा लागला अनेक नागरिक कोरोनाचा धास्ती घेत होते. त्याकरीता ढाणकी शहरात कोविड सेंटर उभी करण्याची संकल्पना ढाणकी शहर पत्रकार संघटनेने सोशल मीडिया वर चर्चा केली त्यावरून शहरातील अनेक दान दात्यांनी कोविड सेंटर उभारणी करिता मदतीचा हात पुढे केला.   शहरात कोरोना कक्ष लोक वर्गणी तुन उभे होत असल्याची कल्पना शहरातील शिक्षकांना लागली.  या कार्यात आपलाही काही सहभाग असावा या हेतूने शिक्षक वर्ग कामाला लागला.शहरा पेक्षा ग्रामीण भागात शिक्षकाची नाळ गावाशी जुळलेली असते गावातील प्रत्येक व्यक्त अडचणी च्या वेळी शिक्षकाचा सल्ला घेत असतात. शहरातील कोरोनाने  शिरकाव गावखेड्यात केल्याने शिक्षक वर्गही धास्तावला होता. ग्रामीण भागाची आरोग्य यंत्रणा ढाणकी शहरावर आवलंबून आहे. ढाणकी शहराला तीस ते चाळीस खेडे जोडलेले असून  गावखेड्या पासून जवळच ढाणकी शहरात कोरोना कक्ष चालू केल्या जात असल्याने निश्चितच त्याचा फायदा खेड्याना सुद्धा होणार आहे.  सामाजिक माध्यमातून जेव्हा कोविड सेंटर ची मोहीम चालु होती आणि समाजाच्या प्रत्येक स्थरातून मदतीचा ओघ येत होता तेव्हा त्यात आपलाही सहभाग नोंदवावा म्हणून राठोड,नारायण गारशेटवार यासर्व शिक्षकांनी करून उमरखेड तालुक्यातील आपल्या सर्व सहकारी शिक्षक मित्रांना सोशल मीडिया वर चर्चा केली आणि मदतीचे आवाहन केले. सामाजिक माध्यमावर ग्रुप करून त्याला  शिक्षक कोव्हिडं सहायता असे नाव देण्यात आले. कोरोना कक्ष उभारण्या करीता 126 शिक्षकांनी जमेल तेवढी मदत केली. शिक्षकांनी केलेल्या मदती मध्ये 90000/ रुपये जमा झाले ढाणकी कोविड सेंटर करीता जमा करण्यात आलेल्या पैश्यामधून   दोन नग ऑक्सिजन कॉन्सट्रेटर  खरेदी करून देण्यात येईलअसे गुरुजींनी  सांगितले. गुरुजींनी  सामाजिक बांधिलकी जोपासत ढाणकी येथील कोविड सेंटरला दोन हवेतून ऑक्सिजन ओढणाऱ्या मशीन देत असल्याने ढाणकी व परिसरातील नागरिक शिक्षकांच्या या सामाजिक कामाचे कौतुक करीत आहेत. 


 जीव धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याचे  मोजमाप घेण्याचे काम करून सुद्धा आम्हांला नागरिकांच्या टिकेला सामोरे जावे लागत आहे. त्याकडे कोणतंही लक्ष न देता प्रशासना ने दिलेली जबाबदारी काटेकोर पणे आम्ही  बजावत आहेत. शिक्षक करत असलेले कामे कोरोना युद्ध सारखे नाही का ? हा मोठा प्रश्न असून  आम्ही केलेल्या आवाहन ला उमरखेड तालुक्यातील आमच्या शिक्षक मित्राने सहकार्य केले त्याबद्दल आर्थिक मदत करणाऱ्या सर्वांचे आभार.   

आनंद कुंबरवार ,  शिक्षक,  ढाणकी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या