तलाठी गजानन सुरोशे यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रशासनाने सन्मान करावा. अकोली ग्रामस्थांची मागणी



ढाणकी प्रतिनिधी -

उमरखेड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या आकोली या गावामध्ये कोरोना या महामारीवर आळा बसविण्यात तलाठी गजानन सुरोशे यांनी तारेवरची कसरत केली. खरे तर या गावामध्ये पहिला रुग्ण आढळल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु तलाठी गजानन सुरोशे याच्या सर्तकतेने आकोली या गावामध्ये कोरोना या माहामारीला   पाय पसरु दिले नाही.ख या गावामध्ये पहिला रूग्ण आढळून आल्याने लगेच दुसऱ्या दिवशी कोरोना तपासणी शिबीर लावले आणि त्या शिबिरामध्ये जवळपास आकोली गावामध्ये ९ रुग्ण आढळून आले. त्या सर्व रूग्णांना औषध उपचार देऊन ग्रुहविलगीकरण ठेवण्यात आले आणि गावातील ४५ वर्षा वरील नागरीकांना ताबडतोब लस घेण्यासाठी ढाणकी येथील आरोग्य केंद्रात स्वतः  नेवुन लस घेण्यास प्रवृत्त केले त्या मुळे आकोली या गावामध्ये कोरोनाने पाय पसरले नाही आणि आज हे गाव सुरक्षीत राहिले. म्हणून आकोली गाव वासियांनी  कोरोनाचा  खरा योध्दा तलाठी गजानन सुरोशे यांचा  शासनाने कोरोना योध्दा सन्मान करावा  अशी मागणी आकोलीवासी याकडून होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या