उमरखेड प्रतिनिधी -
कोरोना मुळे सद्यस्थिती ऑक्सिजनची किंमत काय असते हे सर्वांनाच कळून चुकले आहे. वृक्ष असतील तर पुरेसा ऑक्सिजन मिळणार मात्र सर्रास होत असलेल्या वृक्षतोंडी मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पृथ्वीवर असे वेगवेगळे संकट येत आहेत. ढाणकी शहरात सुद्धा नगरपंचायत अंतर्गत क्षेत्रात अवैध वृक्षतोड होत असून त्या विरुद्ध नितनाम फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष तिरमकदार यांनी नगरपंचायत ला अर्ज सादर केला आहे. ढाणकी परिसरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वृक्षतोड होत असून यावर नगर पंचायत ने अंकुश लावणे गरजेचे आहे. वृक्षतोड करण्यासाठी नगरपंचायत चा ठराव घेण्याची त्यानंतरच वृक्षतोड करण्याची तसेच एका झाडाच्या मोबदल्यात 5 झाड लावण्याची अट सुद्धा नगरपंचायत ने घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये 30 ते 40 वर्ष जुने पिंपळाचे वृक्ष होते. अतिशय डेरेदार असलेल्या या वृक्षमुळे परिसरात मोकळी हवा राहत असून वेगवेगळ्या पक्षाचा सुद्धा राबता असायचा मात्र त्या वृक्षाची सुद्धा कत्तल करण्यात आली आहे. याबाबत वृक्षप्रेमीं मध्ये तीव्र नाराजी असून सदर वृक्षतोड करणाऱ्या विरोधात कठोरातील कठोर कारवाई करण्यात करण्याची मागणी आता जोर धरत आहे.नितनाम फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष तिरमकदार यांनी या वृक्षतोडी बाबत आवाज उठवला असून यावर नगरपंचायत प्रशासन काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

0 टिप्पण्या