ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करा वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.



ढाणकी प्रतिनिधी 

सध्या परिस्थिती मध्ये ढाणकी व परिसरात कोरोना संसर्गाने हाहाकार घातला असून रौद्र रूप धारण केले आहे,

अनेक रुग्ण ऑक्सीजन आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत,

यामुळं नागरिकात प्रचंड दहशत निर्माण झाली  आहे,

सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करणे परवडत नाही, कुठेही बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने घरातील कर्ते पुरुष आणि महिला मृत्युमुखी पडल्याच्या घटना काही दिवसात ढाणकी व परिसरात घडल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे,

ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 50 बेडचे सुसज्ज असे कोविड  केअर सेंटर सुरू केल्यास ढाणकी व परिसरातील जवळपास पन्नास गावातील नागरिकांना यातून उपचार घेता येईल, रुग्णांना उपचाराअभावी आपले प्राण गमावण्याची वेळ येणार नाही यातून अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात, ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत आहे,  मध्ये संडास बाथरूम आणि पाण्याची व्यवस्था आहेत सद्यपरिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील बहुतांशी खोल्या रिकाम्या अवस्थेत पडले आहेत या जागेवर कोड केअर सेंटर सुरू करून ढाणकी व परिसरातील पन्नास गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही, याविषयी  गांभीर्याने त्वरित विचार करून ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे,

ढाणकी नगर पंचायत चे वंचित चे नगरसेवक संबोधी गायकवाड यांनी निवेदनाद्वारे उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्याकडे केली आहे, या मागणीचे निवेदन पंचायत समितीचे सभापती प्रज्ञानंद खडसे यांना सुद्धा देण्यात आले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या