विद्यार्थ्यांना वही व पेन वाटून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती केली साजरी. खरूस बु येथील ग्रामस्थांचा उपक्रम.



ढाणकी प्रतिनिधी - 

विश्वरत्न  बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खरूस बु करानी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करून डॉ बाबासाहेबाना आदरांजली वाहिली.   डॉ बाबासाहेबानी शिक्षणाचे महत्व जाणले होते.  त्यांच्या म्हणण्यानुसार पोटाला कमी भाकरी असली  तरी चालते मात्र ज्ञानासाठी पुस्तके कमी पडता कामा नये  हाच त्यांचा संदेश मनात घेऊन खरूस बु येथील ग्रामस्थानी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांना 450 वही व 450 पेन वाटप करून आगळ्या वेगळ्या रूपाने जयंती साजरी केली. 

डॉ बाबासाहेबांच्या जयंती निमित्त इतर खर्च न करता जर शैक्षणिक वस्तू विद्यार्थ्यांना दिल्या तर तिच खरी बाबासाहेबाना आदरांजली ठरेल अशी कल्पना ग्रामस्थांच्या डोक्यात आली आणि त्याची अंमलबजावनी करून वही व पेनाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून यशस्वीते साठी बाळासाहेब आबासाहेब देवसरकर,  संदेश धुळे,  सखाराम सावते,  बाळासाहेब सावते,  सुधाकर कांबळे सम्राट अशोक बुद्ध धम्म परिषद आयोजक,  आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या