कन्यारत्न प्राप्त झाल्याच्या आनंदात वाटली निराधार महिलांना साडी चोळी.

 

ढाणकी प्रतिनिधी -आज मुलगी झाली म्हणजे ओझं समजणाऱ्या समाजात काही असे सुद्धा व्यक्ती असतात की,  मुलगी झाली की त्याचा आनंदोत्सव साजरा करतात आणि त्यात समाजातील दुर्बल  घटकांना सुद्धा सामील करून आनंद द्विगुणित करतात. 

ढाणकी पासून जवळ असलेल्या सावळेश्वर येथील विक्रांत देविदास  रावते यांना प्रथम कन्यारत्न प्राप्त झाल्याने त्यांनी त्या आनंदात इतरांना सहभागी करण्यासाठी आणि आपण सुद्धा समाजाचे काही देणे लागतो या हेतूने गावातील निराधार महिलांना साडी चोळी चा आहेर करून आपला आनंद व्यक्त केला. 

आज फक्त पहिला मुलगाच पाहिजे या मानसिकतेत असणाऱ्या समाजात मुलगी झाली की काही लोक आपली नाक मुरडतात.  विक्रांत रावते यांनी मात्र या मानसिकतेला फाटा दिला आणि मोठ्या उत्सहात पहिल्या मुलीचे स्वागत केले.  त्यांच्या या कार्याचे इतरांनी सुद्धा बोध घेऊन मुलींच्या जन्माचे स्वागत करायला हवे असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी  दत्तराव पाटील रावते,  महेश रावते,  दिनेश रावते,  दत्तराव रावते,  ज्ञानेश्वर देवसरकर ,  गजानन दिवटेवाड, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या