अवैध रेती उपसा करणार्यांवर बिटरगाव पोलिसांची धडक कारवाई.



ढाणकी प्रतिनिधी -

पैनगंगा नदी पत्रातून अवैध पणे रेती उपसा करणाऱ्या दोंघांच्या मुसक्या बिटरगाव पोलिसांनी काल आवळल्या. 

सविस्तर वृत्त असे की, रतन नाईक शेतशिवारात जगदीश पाटील पेंडाच्या घाटावरून हिमायतनगर येथील काही ट्रॅक्टर अवैध पणे रेती उपसा करून विकत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार विजय चव्हाण यांना मिळाली.माहिती मिळताच पोना अतिश जरांडे,  पो कॉ खामकर,  यांना घेऊन प्राप्त माहिती नुसार धाड टाकल्या वर तेथे राम कृष्णा गुंडेवार वय 22 वर्ष व मारुती गौराप्पा बास्टेवाड वय 55 वर्ष  हे दोघे  महिंद्रा कं  पनीचा ट्रॅक्टर एम एच 26 बी 3032 नंबर असलेला रेती उपसा करताना आढळले.  दोघांनाही पकडून त्यांच्या कडून रेती व टॅक्टर ची एकूण किंमत 510000 अंदाजेचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध 379,  188 भादंवि नुसार गुन्हा नोंद केला आहे.  पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या