ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी येथे पैशाच्या देवाण घेवाण च्या वादातून एका 40 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. येथील मृतक गजानन गायकवाड हा येथील मूकबधिर शाळेवर सेवक म्हणून काम करत होता. यासोबतच त्याचा वीट भट्टी चा कारखाना होता. आरोपी शंकर पिराजी हरकरे राहणार ढाणकी हा मृतक गजानन गायकवाड यांच्याकडून उधारीवर विटा घेऊन ग्राहकाला विकत होता. दोघांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण होती. परंतु आरोपी याने उधारीवर नेलेल्या विटा चे पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. आणि वादावादी करत होता त्यामुळे मृतक गजानन गायकवाड वय 40 वर्ष याने दिनांक 10 एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास मूकबधिर शाळेतील खोलीमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केल्याची माहिती मिळताच बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण पीएसआय रामकिशन जायभाये, बीट जमादार मोहन चाटे, जमादार रवी गीते , पोलीस कॉन्स्टेबल निलेश भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल सतीश चव्हाण, यांनी लगेच मूकबधिर शाळा गाठत तपासणी केली असता मृतकाच्या खिशामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. याची तक्रार मृतकाच्या भाऊ सुभाष गायकवाड यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनं ला दिली असून गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रामकिसन जायभाये करत आहेत.

0 टिप्पण्या