ढाणकी प्रतिनिधी -अखंड समाजसेवेचा वसा घेतलेल्या वर्मा कुटुंबियांना मधील सदस्य भाजपा ढाणकी चे शहर अध्यक्ष रोहित वर्मा यांनी आपल्या वाढदिवसाचा होणारा अनावश्यक खर्च टाळून प्राथमिक आरोग्य केंद्राला 100 सलाईन भेट देऊन अतिशय साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत समाजात नवीन पायंडा घातला आहे.
सध्या ढाणकी शहरात विविध आजारानी तोंड वर काढले असून सर्व दवाखाने रुग्णांनी भरलेले आहे. अश्या वेळी गरिबांचा आधार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईन चा तुटवडा असल्याची बाब रोहित वर्मा यांना कळाली. त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधतं थेट रुग्णालय गाठून 100 सलाईन भेट म्हणून दिले. त्यामुळे गरीब रुग्णाना आता सहज सलाईन उपलब्ध होणार आहे.
असेच सामाजिक कार्य करत रोहित वर्मा आपला वसा पुढे चालवत असून समाजातील गरीब, अडलेल्या, रुग्णांच्या सेवेत व ते सदैव उभे असतात. त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
शांत, संयमी असे व्यक्तीमत्व असलेल्या रोहित वर्मा यांनी गेल्या वर्षी सुद्धा लॉकडाऊन मध्ये गरिबांना मोठ्या प्रमाणात मदत केल्याचे नागरिक बोलत होते.


0 टिप्पण्या