ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण संख्या लक्षात घेता शहरात आज दिनांक 10 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत आठ दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्यात आला असून जनतेने सुद्धा आपला प्रतिसाद दिला आहे. आठ दिवस फक्त दवाखाने व मेडिकल सोडून सर्व कडकडीत बंद असणार आहे. या बंद मुळे तरी कोरोनाची साखळी तुटेल अशी आशा व्यक्त केल्या जात आहे.
शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरात 170 रुग्ण संख्या झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण होम कोरंटाईन न राहता घरा बाहेर बिनधास्त फिरत आहे त्यामुळे कोरणा ची साखळी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून ती मोडण्यासाठी नगरपंचायत विविध उपाय योजना करत आहे. सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद असली तरीही नागरिक बाजारपेठ मध्ये फिरत असल्याने ढाणकीत चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमी वर उमरखेड चे उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी ढाणकी येथे येऊन परिस्थिती चा आढावा घेतला.यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश सुरडकर, बिटरगाव पोलीस स्टेशनं चे ठाणेदार विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये, पोलीस कर्मचारी, तलाठी, नगरसेवक उपस्थित होते. शहरा मध्ये काही कर्मचारी व व्यापारी यांनी कोरोना लस घेतली नसल्यास व कोरोना टेस्ट केली नसल्यास त्यांच्याकडून दंड आकारला जाईल असे उमरखेड उपविभागीय महसूल अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी शहरातील दि.यवतमाळ अर्बन कॉ बँक व राजलक्ष्मी सहकारी सोसायटी यांच्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. त्याच बरोबर कोरोना नियमाचे काटेकोर पालन करा अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असे स्वप्निल कापडणीस यांनी नागरिकांना व व्यापाऱ्यांना सांगितले.
कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित असून लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सुद्धा या वेळी प्रशासनाच्या वतीने त्यांनी केले.

0 टिप्पण्या