निंगनूर प्रतिनिधी -
उमरखेड पंचायत समितीची निवडणूक जवळ येऊन ठेपली. उमरखेड तालुक्यात वर्षानुवर्षे पंचायत समिती व जिल्हा परिषद तिकीटसाठी घराणेशाही चा वारसा चालवण्यास आलेला आहे. आजपर्यत पंचायत समिती निवडणुकीत युवक वर्गाला कधीही संधी देण्यात आलेली नाही. उमरखेड तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले,समाजभानाची जाणीव असलेले अनेक युवक कार्यरत आहेत.त्याच प्रमाणे प्रतेकाना संधी द्यावी.जो व्यक्ती सतत समाजासाठी झटत आहे. त्यांना त्या समाजाची जाणीवही आहे. अस्या व्यक्तींनी संधी द्यायला हवी. गावात वेगवेगळ्या संघटेनेचे होतकरू तरुण कार्यक्रते आहेत.त्यांचं प्रमाणे उमरखेड तालुक्यातील निंगनुर या गावचे ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निंगनुर गावचे मारोतराव गव्हाळे यावेळी पंचायत समिती निवडणुकीत उभे राहणार.मारोती गव्हाळे हे एक जिज्ञासू ,होतकरू, गरीब,जनतेचे काम करणारा चेहरा असून,जनेतचा आवडीचा माणूस आहे.तो सद्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तालुका अध्यक्ष आहे. बिरसा ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष आहे.तो पत्रकार असल्यानेही लोकांना लवकरात प्रश्न निकाली काढून. येथील जनतेला न्याय देऊ शकतो. तो एम ए मराठी, एम ए इतिहास,बि एस्सी अॅग्रीकल्चर,म्हणजे उच्चशिक्षित असल्याने येथील लोकांनी त्यांना पसंती सुद्धा दर्शविली आहे. आहे.असेही येथील जनतेमार्फत बोलल्या जाते.त्यांनी या अगोदरही पदावर नसताना,गरीब जनतेचे बँकेचे कामे, शेतकऱ्यांचे कामे,प्रत्येक क्षेत्रातील कामे ताबडतोब निकाली काढले त्यामुळे त्यांना येथील जनता पसंती देत आहे ....
मी माझ्या सर्व समाजबांधवाचे, कोणत्याही क्षेत्रातील कामे असतील,ती कामे निकाली काढून,माझ्या मतदार संघातील प्रत्येक जनतेला न्याय मिळवून देईल, मारोतराव गव्हाळे यांनी सांगितले...

0 टिप्पण्या