तलवारीने केक कापणे पडले महागात. वाढदिवसात तलवार काढणाऱ्या विरोधात बिटरगाव पोलिसांची कारवाई.

  


ढाणकी प्रतिनिधी

आज काल वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटातील दृष्या प्रमाणे भाई चा  वाढदिवस म्हणत तलवारी ने केक कापण्याचे  प्रकार वाढत आहेत.  असलाच काहीसा प्रकार सावळेश्वर येथे घडला असून  अश्याच एकाच्या च्या मुसक्या बिटरगाव पोलिसांनी आवळल्या आहेत. 

सावळेशवर येथील कपिल काळबांडे यांचा दि. 30/03/2021 रोजी 25 वा वाढदिवस होता सदर वाढदिवसा निमित्त सावळेश्वर  येथे आरोपी कपिल काळबांडे याने जंगी पार्टीचे आयोजन करून सदर पार्टीला, सिद्धार्थ काळबांडे, अजय काळबांडे, आकाश काळबांडे, स्वप्नील काळबांडे   यांना पार्टीला बोलावून साउंड लावून नाचगाणे करून वाढदिवसाची पार्टी सुरु केली 

.वाढदिवसाची पार्टी रंगात आली असताना कपिल याने  आपल्या घरातील  तलवार आणून गाण्याच्या धुंदीत तलवार  फिरवली त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. सदर पार्टीचे व्हिडीओ चित्रीकरण करून सदर क्लिप  हि व्हाटसप वर प्रसारित करून गावमध्ये दहशत निर्माण केली. गोपनीय माहितीचे आधारा  वरून बिटरगाव पोलिसांनी कपिल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील तलवार जप्त केली.  सध्या कोरोनाचा काळ सुरु असून जिल्हात जमावबंदी लागू असताना अश्या प्रकारे बेकायदेशीर पणे जमाव जमवणे हे कायदेशीर दृष्ट्या चुकीचे आहे.  त्यामुळे बिटरगाव पोलिसांनी आरोपी व सहकर्याना च्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या विरुद्ध  अप. न. 62/2021 कलम 135 मपोका  269 भादवी सह कलम 4/25 आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर  कारवाई ठाणेदार  विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायेभाये, पोना रवी गित्ते, मोहन चाटे, पोका  सतीष चव्हाण, दत्ता कुसराम  यांनी केली पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण हें करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या