यशोगाथा. डच जातीच्या गुलाब फुल उत्पन्नातून महिलांनी साधली आर्थिक प्रगती.



उमरखेड  प्रतिनिधी -समाजात वावरताना आपण आज पाहत आहोत की सगळी कडे बेरोजगारी बद्दल मोठ्या प्रमाणात ओरड होत आहे.  शासन सरकारी नोकऱ्या काढत नाही,  काढल्या तर लवकर नियुक्त्या देत नाही.  वाढते वय.  या सर्व बाबी आजचे तरुण मुलं मुली मग आत्महत्ये चा रस्ता निवडतात मात्र मनात जर काही करून दाखवायची जिद्द असेल तर काहीही अवघड नाही.शासन स्वयं रोजगार निर्माण करा असे वारंवार आवाहन करत असून याच आवाहनाला प्रतिसाद देत महिलांनी बचत गट स्थापन करून डच गुलाब निर्मिती च्या एका नव्या क्षेत्रात पदार्पण करून एक नवे आव्हान स्वीकारले आहे आणि ते आजच्या तरुण पिढी साठी प्रेरणादायी निश्चितच ठरेल.  आज प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगती करत असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्र गाजवत आहे.  आज महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक संपन्न होत असून एक वेगळेच उत्पन्नाचा साधन निर्माण करत आहेत.  ही यशोगाथा आहे हिंगोली येथील धान फाउंडेशन अंतर्गत आकाशझेप कलनजियम महिला महासंघ यांची. 



20 गुंठे या अत्यल्प जमिनी मध्ये गुलाबफूलाची लागवड करून या महिलांनी आपली प्रगती साधली आहे. 

अंधारवाडी येथील 55 महिला या साठी एकत्र येऊन त्यांनी बचत गट स्थापन केला. व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल त्यांना मानव विकास मार्फत 43 लाख 89 हजार मंजूर झाले.  गुलाब लागवड करण्यासाठी महिलांनी 20 गुंठे जमीन ही चार वर्षासाठी भाडे तत्वावर घेतली.  आणि पॉलिहाऊस उभारून आपल्या व्यवसायाचा श्री गणेशा केला.  फुल विक्री साठी त्यांनी राजदीप एन्टरप्रायजेस तळेगाव दाभाडे पुणे यांच्याशी करार केला.  करारा मध्ये कंपनीने पॉलिहाऊस बांधणे,  त्यात डच गुलाबांची लागवड करणे व तोडणी पर्यंतचा खर्च कंपनीने करणे असे ठरले. 10बाय 10 ची रूम आणि महिंद्रा कंपनीची माल वाहतूक गाडी घेऊन देने अश्या प्रकारे वरील रक्कम वापरण्यात आली. पहिल्या तोडणी मधेच 245 फुल निघाली ती मार्केट मध्ये विकली असता 280 रु मिळाले. आता दोन तीन दिवसा आड 2500 ते 3000 फुल मिळत आहेत. त्याची रक्कम 4000 ते 5000 असून आज पर्यंत गटाला 9000 ते 10000 रु मिळाले आहेत. खर्च जाता 7 ते 8  हजार रुपये निवळ नफा मिळाला आहे. 

दर वर्षी यामधून 5 ते 6 लाखाचे फुलाचे उत्पादन होऊन 3 ते 4 लाख फायदा होईल असा विश्वास महिलांनी बोलताना व्यक्त केला आहे.  या महिलांचा समाजातील इतर महिलांनी सुद्धा आदर्श घेऊन आपली अर्थीक उन्नती साधन्याचे धान फाउंडेशन हिंगोली तर्फे करण्यात आले. 





डच गुलाब फुलांच्या लागवड व उत्पादन हे मोठे आव्हानात्मक क्षेत्र आहे,  मात्र हे आव्हान ह्या 55 महिलांनी स्वीकारले,  यांनी लागवडी साठी 20 गुंठे जमीन भाडे तत्वावर घेऊन प्रकल्प सुरु केला असून यांना या महिलांना मानव विकास काढून अनुदान सुद्धा मिळाले असून हळू हळू गुलाबांची मागणी सुद्धा वाढत आहे.  तरी इतर महिला,  युवक आणि युवतींनी याचा आदर्श नक्की घ्यावा. 

अनिल दवणे 

व्यवस्थापक धान फाउंडेशन हिंगोली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या