ढाणकी प्रतिनिधी -वसीम रिजवी या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने मुस्लिम धर्मियांमध्ये महत्वाच्या असलेल्या कुराण ए पाक संबंधी आपत्तीजनक विधान करून कुराण मधील 26 आयत काढून टाकण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून अश्या विकृत माणसांवर ताबडतोब गुन्हा दाखल व्हावा यासाठी ढाणकी येथील मुस्लिम समाजबांधवांनी पोलीस स्टेशनं बिटरगाव येथे निवेदन दिले. वासिम रिजवी हा शिया बोर्डाचा माजी चेअरमन आहे. निवेदन देताना सै तोसीफ सै खालिद, शे जब्बार शे महेमूद, शेख एजाज पटेल, सय्यद मजीद सय्यद पाशा, मो शाहरुख व समाज बांधव उपस्थित होते.

0 टिप्पण्या