सावळेश्वर येथे ग्रामस्वच्छता करून केली विकास कामाला सुरुवात.



सावळेश्वर प्रतिनिधी- चंद्रमणी काळबांडे

 तालुक्यातील अतिशय अटीतटीच्या झालेल्या सावळेश्वर येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदार राजांनी नवीन चेहर्‍यांना संधी देत  ग्राम  विकासाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली.

 निवडणूक वचननाम्यात वचन दिल्याप्रमाणे नवनिर्वाचित उमेदवारांनी सुद्धा गाव विकासाची जबाबदारी स्वतः  खांद्यावर घेत ग्रामविकासाला सुरुवात केली आहे.

 सर्वप्रथम स्वच्छतेचे महत्त्व जाणत गावाचे सरपंच सौ अर्चना ओम रावते , उपसरपंच बालाजी शंकरराव शिंदे, व सदस्यांनी  गावातील अनेक वर्षापासून तुंबलेल्या नाल्या साफ करून ग्राम स्वच्छता केली. 

 या तुंबलेल्या नाल्या मुळे गावात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता होती.

 त्याचप्रमाणे आता उन्हाळ्याची चाहूल लागल्याने गावामध्ये पाणी समस्या निर्माण होऊ शकते? बाब  मनात हेरून मागील बऱ्याच दिवसापासून बंद असलेले पाणी फिल्टर सुद्धा दुरुस्त केले.  गावाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यामागचा उद्देश होता. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पल्लवी विक्रांत रावते यांनी बोलताना सांगितले की, कोणताही नागरिक आमच्याकडे समस्या घेऊन आल्यानंतर आम्ही सर्व मिळून त्यांच्या  निराकारण करण्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा सावळेश्वर गावाला आदर्श ग्राम म्हणून विकसित  करू. यानंतर आम्हाला रस्ते, पथदिवे, योग्य, याकडे सुद्धा लक्ष द्यायचे आहे.

 यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिता परमेश्वर रावते, पुंजाबाई पांडुरंग काळबांडे, निकिता दत्तराव रावते, अंकुश उत्तमराव काळबांडे, भागीरथी मारुती काळबांडे, धुरपताबाई आनंता काळबांडे,, व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या