उमरखेड प्रतिनिधी - जिल्हातील गेल्या वर्षी पासून बंद असलेल्या आधार संचाचा तिढा जिल्हा प्रशासनाने सोडवला असून महाऑनलाईन मध्ये असलेले हे संच आता महा आय टी या नवीन कंपनीत चालु करून देण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये महा ऑनलाईन आणि महा आयटी चे जिल्हा व्यवस्थापक श्री फिरोज पठाण यांची महत्वाची भूमिका असून त्यांच्याच पाठपुरावा मुळे वर्षांपासून बंद असलेले आधार संच पुन्हा चालु झाल्याचे आधार संच धारकांचे म्हणणे आहे. यामुळे आता नागरिकांना आधार बाबत सुविधा मिळणार आहे.
आधार कार्ड हे केंद्रशासनाचा उपक्रम असून सर्वच सरकारी कामा करिता आधार कार्ड हे अत्यावश्यक असताना जिल्हातील अंदाजे 20 आधार संच हे वेगवेगळ्या कारणाने बंद होते. त्यामुळे नागरिकांना मोठी समस्या निर्माण होत होती. त्याच प्रमाणे आधार संच धारकांवर देखील उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे आधार संचाच्या चौकशी बाबत जेव्हा जेव्हा संच धारक यवतमाळ येथे येत असे तेव्हा व्यवस्थापक श्री फिरोज पठाण त्यांची आपुलकी ने चौकशी करत त्यांच्या शंकाचे समाधान करत असल्याचे व बऱ्याच वेळा जेवण आणि बस चे भाडे सुद्धा स्वतःच्या खिशातून देत असल्याचे एका आधार संच धारकाने सांगितले. कोरोनाने संपूर्ण भारतात हाहाकार माजवला असताना देशात लागलेले लोकडाऊन आणि महाऑनलाईन कंपनीचा यूआयडीआय सोबत चा करार संपल्याने बंद असलेले संच पुन्हा सुरु करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. तेव्हा जिल्हा व्यवस्थापक फिरोज पठाण यांनी जिल्हा प्रशासनाची पत्र व्यवहार करत बंद असलेल्या आधार संच पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न चालवला व त्यांच्या प्रयत्नाला यश येत मागील आठवड्यात जिल्हातील 9 आधार संच हे महा आय टी या नवीन कंपनीत सूरू करून देण्यात आले. विशेष म्हणजे महा ऑनलाईन कंपनी कडे थकीत असलेले आधार संच धारकांचे पैसे सुद्धा त्यांना पठाण यांच्या पाठपुरावा मुळे मिळाल्याने आधार संच धारकांत आनंदाचे वातावरण होते.
अतिशय शिस्तप्रिय असलेले यवतमाळ जिल्हाचे जिल्हाधिकारी श्री एम देवेन्दर सिंग हे नेहमीच जनहिताचे निर्णय घेत नागरिकांना उत्कृष्ट सेवा मिळण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या व निवासी उपजिल्हाधिकारी श्री ललितकुमार वऱ्हाडे आणि जिल्हाप्रशासनाच्या सहकार्याने हे संच हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आल्याचे या वेळी फिरोज पठाण यांनी बोलताना सांगितले.

0 टिप्पण्या