एके काळी देशात सर्वात मोठा व्यापार करणारा समाज ते आज नुसतं "भटक्या जमाती चा" समाज ,असा संघर्षमय प्रवास करणारा समाज म्हणजे "बंजारा" समाज.
इंग्रज यायच्या आधी देशात राजेशाही होती,विविध राजे विविध राज्यात राज्यकारभार चालवीत असत,आणि या सर्वांना अन्नधान्य,* *मीठ ,मसाला,कपडेलत्ते पुरविण्याच काम हा बंजारा समाजाच होत. बैलाच्या पाठीवर लेदनी भरून हा समाज रानोरानी, डोंगरदर्यातून जाऊन माल पुरवत असे. नंतर इंग्रज आले ,व्यापार करता करता त्यांनी देशालाच विकत घेतला आणि झाला गुलाम आपला देश....आणि त्याही काळात हा समाज इंग्रजांच्या सैनिकांना मीठ,मसाला ,धान्य पुरवत असे.*
पण नियतीला काही वेगळंच हवं होतं,त्या काळी इंग्रजांनी १८७१ ला एक कायदा बनवला होता,की काही जमातींना "जन्मजात गुन्हेगार जमात" समजलं जावं,आणि एकूण १९८ जमाती यामध्ये निवडल्या गेल्या त्यात सर्वात मोठी आदिवासी जमात असलेली बंजारा जमातही होती,ही जमात लमानी, बंजारी,सिंगाडी, लंबाडी आदी नावांनी ओळखली जायची.आणि जन्मताच संघर्ष करणारा हा समाज हजारो किलोमीटर पायांनी प्रवास करून ,आधी रस्ते नव्हते तर जिथून वाट लागेल तिथून डोंगरातून जात असे.आणि या समाजाची विलक्षण संस्कृती ही आजही जगाला वेड लावणारी आहे.आणि ती आजपण जपून ठेवली हीच या समाजाची खूप मोठी श्रीमंती आहे.स्त्रियांची वेशभूषा आणि केशभूषा या दोन्ही आजही टिकून आहे.केशभूषा करताना केसांना वेगवेगळे आळा पिळा स्त्रिया देत,त्यावर आरसे लावून सोन्या चांदीच्या दागिन्यांनि त्या सजवत आणि केसाच्या वेण्या चेहऱ्यावर सोडून चेहरा झाकून घेत होत्या... म्हणजे जणू संस्कृती जपणारा प्रतीक अशी वेशभूषा या समाजाची... पण आदिवासी समाज म्हणून जन्माला आलेला हा समाज ,आजही आदिवासी सवलती पासून वंचित आहे,कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली या ठिकाणी च फक्त बंजारा समाज हा आदिवासी जमातीत गणला जातो,महाराष्ट्र मध्ये या समाजाला ओबीसी म्हणून गणतात. गुरू नानक ज्याची शिकवण होती की देश प्रेम आणि देश सरंक्षण हेच खऱ्या धर्माचं प्रतीक, आणि ही शिकवण सर्व प्रथम अमलात आणणारा समाज म्हणजे बंजारा समाज,म्हणून दिल्ली, हरियाणा, पंजाब मध्ये लाखो शिखपंथीय बंजारा लोक आढळून येतात.बंजारा जमात ही हिंदू, मुस्लिम, शीख पंथीय असली तरी तिची बोलीभाषा एकच आहे ती म्हणजे "गोरमाटी".इतर जमाती पेक्षा वेगळे संस्कार घेऊन जगणाऱ्या या जमातीची भारतभर एकच संस्कृती आहे.असा हा संस्कृती प्रिय समाज आज च्या घडीला स्वतःच्या अस्तित्वासाठी अजूनही संघर्ष करतोय,"एक बोली,एक संस्कृती असूनही एका वर्गवारीत या जमातीला घेण्यात आला नाही,फाळणीच्या वेळी १५-२० लाख सिंधी लोक पाकिस्तान मधून येतात आणि त्यांच्या भाषेला भारतात मान्यता मिळते पण याच देशात राहून विलक्षण संस्कृती ला जपणारा बंजारा समाजाच्या भाषेला मात्र साधी मान्यता मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. ज्या समाजाने देशाला मीठ पुरवलं, आज त्याच समाजाचा मीठ देशवासियांना चवीला आलं नाही,ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.आदिवासी असूनही यात गणना न होणे,एक भाषा असूनही मान्यता न मिळणे,सवलती असूनही त्या न मिळणे.... म्हणजे हा अन्यायच ना.....कुठं चुकलं असावं नेमकं?व्यापार करणं हीच चूक भोवली असणार का या जमातीला??वेगवेगळ्या राज्याच्या क्षेत्रिय बंधनात अडकलेल्या या समाजाची एकजूट आज स्वातंत्र्य मिळाल्या नंतर सुद्धा झाली नाही, कदाचित होऊ दिली नाही हा एक मन विचलित करणारा प्रश्न आहे... भटकणाऱ्या समाजाला याच नावानं ओळखलं जाणार का ? की मिळनार न्याय या जमातीला कधी तर....? आणि खरंच हा समाज भटकणारा आहे की भटकवण्यात आला आहे हा एक संशोधन करण्यासारखं प्रश्न आहे...प्रवास जन्मताच गुन्हेगार जमातीत जन्माला आलेल्या आदिवासी जमातीतील बंजारा समाजाचा.
अजिंक्य राठोड
जांब (घमापूर )
ता उमरखेड जिल्हा यवतमाळ
Mo. 9889787532

0 टिप्पण्या