गांजेगाव येथे विज पडून शेत मजुराचा मृत्यू.

  


ढाणकी प्रतिनिधी -

ढाणकी पासून जवळच असलेल्या गांजेगाव येथे शेतात काम करत असलेल्या मजुराच्या अंगावर विज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 8 मे रोजी सायंकाळी 5 वाजल्याचा सुमारास अचानक आलेल्या विज गर्जनेसह पावसाने शेतात काम करत असलेल्या पुंजाराम तुकाराम वाढेकर वय अं 59वर्ष हे झाडाखाली उभे असताना त्याच्यावर विज कोसळली.  त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.  ह्या घटनेने गांजेगाव मध्ये हळहळ व्यक्त केल्या जात असून मृताच्या परिवारास काही आर्थिक मदत मिळण्याची मागणी होत आहे. 


         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या