रस्ता हरवला आहे. ढाणकी शहरातील जुन्या रस्त्यावर नगरपंचायत चे दुर्लक्ष. निधी लेआऊट च्या रस्त्यात खर्च.



ढाणकी प्रतिनिधी

नगरपंचायत निवडणुकी मध्ये शहर विकासाच्या मुद्द्यावरून नागरिकांनी  नगरसेवक निवडून दिले. शहर विकासाचे ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी नगरसेवक अपयशी ठरत असल्याचे चित्र काही प्रभागा दिसत असल्याचे बोलले जात आहे.  शहरांमध्ये जुन्या वस्तीमध्ये ज्या ठिकाणी  अद्यापही रस्ता झाला नाही त्या ठिकाणी रस्ता होत नसल्याने अनेक नागरिक त्रस्त झाले असून  मात्र लेआउट मध्ये रस्त्याचे काम चालू असल्याने नागरिकात नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

नगरपंचायत निवडणुकीमध्ये जो जाहीरनामा नगरसेवकांनी जनतेपुढे मानला होता ते आज काम पूर्ण करण्याची वेळ नगरपंचायत पदाधिकाऱ्यांकडे आली असताना ते आपले आश्वासन विसरले की काय?  हा मोठा प्रश्न आहे. 

शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील संजय लोढा , मिलिंद चिकाटे यांच्या घरासमोरून जाणारा रस्ता शंकर कत्तुलवाड  यांच्या किराणा दुकान पर्यंत समाप्त होतो. या रस्त्याची अवस्था 30 ते 35 वर्षा पासून जैसे थे आहे. या रस्त्यावर ग्रामपंचायत काळात कधीच काम करण्यात आले नाही. तर नगरपंचायत झाल्यानंतर या प्रभागांमध्ये रस्त्याचे काम केल्या जाईल असे आश्वासन नगर नगरसेवक शेख इरफान शेख मस्तान यांनी त्या परिसरातील जनतेला दिले होते. नगरपंचायत मध्ये निधी उपलब्ध असताना संजय लोढा (मिलिंद चिकाटे यांचे घर) ते शंकर कत्तलवाडा या नवीन नाली व रस्ता ठराव घेण्या साठी नगरसेवक  दिरंगाई करत असल्याने शहरातील जुन्या वस्तीच्या रस्त्यांचा विचार केल्या जात नाही व नगरपंचायत लेआउट मध्ये रस्ते बनवण्यासाठी उत्साही दिसत आहे असे नागरिकात बोलल्या जात आहे

प्रभाग क्रमांक 16 मधील हा रस्ता हा देवीच्या मंदिरा कडे जाण्यासाठी सुद्धा महिला वापरत असतात दुसऱ्या रस्त्यावर दारूचे दुकान असल्याने नागरिकांचा कल हा याच रस्त्याने असतो. पावसाळ्यामध्ये या रस्त्याची अतिशय  दुरवस्था होते. दरवर्षी रस्त्याची स्थिती जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.    

 नगरपंचायत प्रभाग क्रमांक 16 मधील संजय लोढा (मिलिंद चिकाटे यांचे घर) ते शंकर कतुलवाड या रस्ता व नाली नवीन बांधकामासाठी कधी मंजूर करतील याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.


प्रभाग क्रमांक 16 मधील तो रस्ता रहदारीचा आहे  रस्त्यासाठी ठराव घेतल्यास नवीन रस्ता व नाली साठी निधी उपलब्ध केल्या जाईल.

श्री आकाश सुरडकर

मुख्याधिकारी

नगरपंचायत ढाणकी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या