आठ वर्षाच्या जवेरीया ने ठेवला रोजा.-LOKमानस



ढाणकी प्रतिनिधी -

मुस्लिम बांधवासाठी पवित्र असलेला रमजान महिना सध्या सुरु आहे.  रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा म्हणजे उपवास ठेवतात. मुस्लिम धर्मात रोजा ला अनन्य साधारण महत्व आहे. मन आणि शरीर शुद्ध करण्याचा तो एक मार्ग आहे. आजच्या या कठीण काळातही माणसाला निरोगी आणि चिंतामुक्त ठेवण्याचे काम रोजा करतो.  रोजा असणारा व्यक्ती दिवसभर काहीही खात किंवा पाणी सुद्धा पीत नाही. सध्या उन्हाळा सुरु असल्याने   रोजा धरणे कठीण समजले जाते मात्र ढाणकी येथील जावेरीया राहील शेख तय्यब या आठ वर्षाच्या चिमुकली ने रोजा धरल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे.  सद्या जगावर भेडसावत असलेल्या कोरोना संकटाने लवकर हद्दपार व्हावे या साठी हा रोजा ठेवल्या  तिने बोलताना सांगितले सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या