ढाणकी प्रतिनिधी -
जगतगुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्य ढाणकी येथे ऑनलाईन तालुका स्तरीयतय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचारांची समाजात रुजवण व्हावी, त्यांचे विचार समस्त जनाला माहित व्हावे या हेतूने लिंगायत युवा समिती ढाणकी च्या वतीने "आवाज माझा विचार महात्म्याचे" या विषयावर ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा दोन गटात होणार असून पहिला गट पाचवी ते सातवी व दुसरा गट 8 ते 10 असा आहे.
सदर स्पर्धेत भाग घेण्याऱ्या स्पर्धकांनी आपले भाषणाचे व्हिडीओ बनवून समितीला दिनांक 26 मे पर्यंत पाठवायचे असून यासाठी समिती मार्फत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तरी या स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन लिंगायत युवा समितीने केले आहे.


0 टिप्पण्या