ब्राह्मणगाव येथे जि. प शाळेला स्कूलबॅग, व सतरंज्याचे वाटप.

   



ब्राम्हणगाव प्रतिनिधी -संदीप पेंटेवाड 

ब्राम्हणगाव येथे जिल्हा परिषद शाळेला जिल्हा परिषद फंडातून मिळालेल्या स्कूल बॅग व सतरंज्या चे वाटप आज करण्यात आले. 

यावेळी जि प सदस्य सौ श्यामलाताई अविनाश कमठेवाड व पंचायत समिती सदस्य सौ अनिताबाई संजय मार्लेवाड यांच्या हस्ते हे वाटप पार पडले.

जि. प शाळेतील विद्यार्थीना  लागणारे शालेय साहित्य  दरवर्षी जिल्हा परिषद मार्फत शासकीय शाळांना  साहित्य पुरवल्या जाते.  त्याचाच एक भाग म्हणून  आज जिल्हापरिषद शाळा ब्राह्मणगाव येथे सतरंज्या व स्कूलबॅग चे वाटप शाळेला करण्यात आले. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील शहाणे,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी रंधे,  उपाध्यक्ष गजानन कोंडरवार,  गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या