ब्राह्मणगावच्या सरपंच पदी परमात्मा गरुडे तर उपसरपंच पदी सौ प्रियंका संदीप गोरे.



ब्राह्मणगाव प्रतिनिधी -संदीप पेंटेवाड 

नुकत्याच झालेल्या ब्राह्मणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनल ने मोठे यश प्राप्त केले होते. मात्र सरपंच पदाच्या सोडतीने सरपंच,  उपसरपंच पद निवडीसाठी वेळ होता.  नुकतेच आरक्षण जाहीर झाले  व सरपंच पदाच्या निवडणूक सुद्धा आज पार पडली या निवडणुकीत परमात्मा गरुडे यांची सरपंच पदी तर सौ प्रियंका संदीप गोरे यांची उपसरपंच पदी बहुमताने निवड करण्यात आली. 

या वर्षीच्या ग्रामपंचायत मध्ये अनेक गावात निकाल धक्कादायक होते त्या मुळे ब्राह्मणगाव मध्ये सुद्धा नागरिकांची कोण होणार सरपंच?  या साठी उत्सुकता लागून होती. सरपंच पदी परमात्मा गरुडे यांची निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. 

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत,   रामदास प्रल्हाद घोडेकर, बालाजी परसराम  कोरेवाड, सौ मायाताई राजकुमार  विनकरे, सौ प्रियंका अमोल पेंटेवाड , सौ  अनुसया मोतीराम वाठोरे, सौ  राजश्री संतोष गंधपवाड , सौ  प्रज्ञा सुरज काकडे, सौ नम्रता प्रदीप वाठोरे, शेख अब्दुल कलाम भाई , सौ संगीता गणेश गौरवाड, सौ रुख्मिना अवधूत बास्टेवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या