निंगनूर येथे विद्यार्थ्यांना मास्क चे वाटप.



निंगनूर प्रतिनिधी -

निंगनूर येथील स्वामी दयानंद सरस्वती विद्यालयात विद्यार्थी ना मास्क चे आज वाटप करण्यात आले. 

कोरोना पासून वाचण्यासाठी सुरक्षित अंतर,  स्वच्छ हात धुणे आणि मास्क ही त्रिसूत्री महत्वाची आहे.  या नियमाचे जर आपण काटेकोर पालन केले तर कोरोना पासून आपण सुरक्षित राहू शकतो ही बाब लक्षात घेऊन निंगनूर चे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जयस्वाल व गजानन नावडे यांनी विद्यार्थ्यांना मास्क वाटप केले.  

कोविड काळात सुद्धा लोकडाऊन मध्ये सुद्धा प्रशांत जयस्वाल व गजानन नावडे यांनी कोरंटाईन केलेल्या व्यक्तींना जेवणाची व्यवस्था केली होती तसेच त्यांना मास्क सुद्धा वाटप केले होते.  नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या या जोडीने हा सामाजिक उपक्रम राबविल्याने निंगनूर मध्ये त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या