ब्राह्मणगाव येथे श्रीमद भागवत सप्ताहाची सांगता.




ब्राह्मणगाव प्रतिनिधी -संदीप पेंटेवाड 

ब्राह्मणगाव येथे श्रीमद भागवत सप्ताहाची सांगता आज करण्यात आली असून भागवत सप्ताहाचा लाभ समस्त ब्राह्मणगाव वासियांनी घेतला. 

लॉकडाऊन नंतर बऱ्याच मोठ्या अवधी नंतर हा सप्ताह आयोजित केल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद ओसंडून वाहत होता. दिनांक 6 फेब्रुवारी पासून भगवत सप्ताहाला सुरवात झाली होती. सप्ताहाच्या सातही दिवस वेगवेगळ्या कीर्तनकारांनी गावकर्यांना भक्ती चा मार्ग साधतं परमार्थ कसा करायचा या बाबत मार्गदर्शन करत संतांच्या सहवासातूनच ज्ञानाची प्राप्ती होते असे सांगितले. 

अतिशय भक्तीमय वातावरणात हा सप्ताह सोहळा पार पडला असून सप्ताहाची सांगता आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी श्रीमद भागवत ग्रंथांची भव्य अशी मिरवणूक काढत करण्यात आली व दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.  या मध्ये समस्त ब्राह्मणगावकर व परिसरातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या