खोदलेली नाली देत आहे अपघातास निमंत्रण.

 


ढाणकी प्रतिनिधी -

स्थानिक कस्तुरबा कन्या शाळे जवळ नगरप्रशासन विभागाने खोदून ठेवलेल्या नाली मुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून या विषयी तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही. 

सविस्तर वृत्त असे की,  ढाणकी शहरातील कस्तुरबा गांधी कन्या शाळे जवळ काही दिवसापूर्वी नगरपंचायत ने मोठी नाली खोदून ठेवली असून अंदाजे पंधरा दिवस होऊन ही कोणतेही कार्य तिथे करण्यात आलेले नाही.  जवळच गुलाबसिंग ठाकूर प्राथमिक शाळा तसेच कस्तुरबा गांधी कन्या शाळा आहेत त्यामुळे तेथे लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात राबता असतो. एखादे जर लहान मुल  या नाली मुळे अपघातग्रस्त झाले तर याला जबाबदार कोण?  असा प्रश्न नागरिक करत आहेत.  

या नाली संदर्भात कस्तुरबा गांधी कन्या शाळेच्या मुख्याधिपिकेने तक्रार द्यायला हवी होती मात्र त्या या कडे दुर्लक्ष करत आहेत.  त्यामुळे या गंभीर बाबीला लक्षात घेऊन सदर प्रभागाचे नगर सेवक शेख इरफान यांनी नागराध्यक्षांकडे तक्रार दिली होती तरीही काम जैसे थे आहे. 


याच  भागात काही दिवसापूर्वी नाली मुळे एका लहान मुलाचा अपघात झाला होता व आता पण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. 

तरी या नालीचे काम त्वरित करण्याची मागणी गावकरी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या