भाजपा ढाणकी चे महावितरण कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन.



 ढाणकी प्रतिनिधी 

कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर देशात लाकडाऊन लागले.

या लॉकडाऊन काळात संपुर्ण जनता ही घरातच होती.

त्यामुळे सर्वांवर हलाखीची परिस्थीती निर्माण झाली.

आणि लॉकडाऊन काळातील भरमसाठ वीजबिले महावितरणने प्रत्येकांना दिली.एक तर लॉकडाऊनमुळे आधीच रोजगार नसल्यामुळे सामान्य नागरीक त्रस्त. त्यात आलेली भरमसाठ वीजबीलं ही एक भर.

सध्याचे राज्यसरकारने लॉकडाऊन काळातील वीजबिल १oo युनीट पर्यंत माफ करणार असे जनतेला पोकळ आश्वासन दिले. ते आश्वासन पूर्ण न करता आता थकीत वीजबील न भरल्यास कारवाईचे आदेश उर्जामंत्र्यांनी दिले.

त्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे आज संपूर्ण महाराष्ट्र भर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी ढाणकी शहर तर्फे आज ढाणकी येथील महावितरण कार्यालयात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. महावितरण ढाणकीचे अभियंता वाघमारे साहेब यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी भाजपा ढाणकी शहराध्यक्ष रोहीत वर्मा, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष दत्तदिगंबरजी वानखेडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम राठोड, 

 ढाणकी न.पं. भाजपा गटनेते संतोष पुरी, नगरसेवक बाळू योगेवार, भाजपा अनुसुचीत जाती मोर्चा तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड ,भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष ढाणकी श्रीकांत देशमुख, प्रकाश जयस्वाल,पुंजाराम मुत्तलवाड, नागेश रातोळे, गजानन चंद्रे,सुनिल मांजरे, मंगेश चोरे, कुलदिप चंद्रे, ओम रावते, साईनाथ धोपटे, राम सोनुने, निरज व्यास, शंकर काळकर, दत्ता हाके यांसह भाजपा ढाणकी शहर चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिटरगांव पो. स्टे. चे ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

     लॉकडाऊन मुळे सामान्य नागरीक आधीच त्रस्त आहे. तेव्हा भरमसाठ विजबील देऊन त्या विजबीलाची सक्तीने वसुली महावितरणने थांबवावी.

कुणाचेही लाईन कनेक्शन कापू नये. असे आढळल्यास भारतीय जनता पार्टी ढाणकी शहर उग्र आंदोलन करेल. यांस जबाबदार ढाणकी महावितरण राहील.

 रोहीत विष्णुदासजी वर्मा

 शहराध्यक्ष भाजपा ढाणकी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या