ढाणकी येथे राम मंदिर निधी संकलन व समर्पण समिती तर्फे भव्य रथ यात्रा संपन्न.

 


ढाणकी प्रतिनिधी -

अयोध्या येथे भव्य स्वरूपात निर्माण होत असलेल्या श्री राम मंदिर निर्मिती कार्यात प्रत्येक भारतीयाचा सहभाग असावा या पवित्र हेतूने  निधी संकलन व समर्पण करण्यासाठी समिती मार्फत भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. 

सकाळीच सर्व गावकरी मंडळी ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे जमा होऊन  प्रभू रामचंद्र यांना अभिवादन करून निधी संकलन रथ  यात्रे ला सुरवात करण्यात आली.  ही यात्रा मिरवणुकीच्या मार्गाने जात संपूर्ण ढाणकी शहरात फिरवण्यात आली.  मिरवणुकीच्या मार्गात सकाळीच महिलांनी रांगोळी काढून रथयात्रेच्या स्वागत केले. मिरवणुकीत वातावरण भक्तिमय करण्यात आले होते तसेच शहरातील भजनी मंडळानी सुद्धा यात सहभाग घेऊन प्रभू रामाचे गुणगान गाण्यात गायले. 



श्री राम मंदिर निर्मिती कार्यासाठी ढाणकीकरानी सुद्धा खारीचा वाटा उचलत आपआपल्या परीने निधी दिला.  विशेष म्हणजे निधी देण्यासाठी कोणावरही जबरदस्ती न करता गावकऱ्यांनी आपला सहभाग दिला. 

या भव्य अशी  रथ यात्रा जुने बस स्थानक येथे येऊन समाप्त करण्यात आली.  यशस्वीते साठी श्रीराम मंदिर निधी संकलन व समर्पण समितीने विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या