बिबट्या ने पाडला वासराचा फडशा. शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण.



ढानकी प्रतिनिधी

 पैनगंगा अभयारन्यातील डोंगरी गाव असलेल्या अकोलीं शेत शिवारात  चक्रधर जनावार यांच्या शेतातील गोठ्यावर जंगली बिबट्याने वासरावर हल्ला चढवून त्याचा जागीच फडशा पडला.  ही घटना दिनांक 29 जानेवारी रोजी मध्यरात्री घडली.  दिवसभर शेतातील कामे आटोपून चक्रधर जन्नावार यांचा सालगडी जनावरांना गोठ्याजवळ मैदानात बांधून रात्री घरी आला व काही कामानिमित्त तो रात्रभर घरी थांबला.  नेमकं त्याच रात्री बिबट्या जनावराच्या गोठ्याजवळ जाऊन कुंठयाला बांधून असलेल्या वासरावर हल्ला चढवून त्याची शिकार केली. बिबट्याने मनसोक्तपणे वासराच्या मांसावर ताव मारून तृप्त होऊन निघून गेला.  सकाळ होताच नेहमी प्रमाणेच सालगडी गाई चे दूध काढण्यासाठी जागलीवर गेला असता वासराची शिकार केल्याचे पाहून तो घाबरून गेला आणि मालक चक्रधर जन्नावार यांना फोन वरून वाघाने वासराला ठार मारल्याची माहिती दिली.  माहिती मिळताच मालक चक्रधर घटनास्थळी पोहचले व झालेल्या प्रकारची माहिती वनरक्षक सोळंके यांना कळविली.  सोळंके यांनी घटना स्थळी धाव घेऊन शिकार केलेल्या जागेवर पाहणी करून हिंस्र पशूच्या बोटाच्या ठश्याची ओळख पटवली.  आणि बिबट्या या जंगली प्राण्यांने वासराची हत्या केल्याची त्यांच्या लक्षात येताच  त्यांनी ढाणकी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाबासाहेब कुंभार त्यांना बोलावून वासराच्या शवाचे विच्छेदन केले व पंचनामा केला.  यावेळी शेतकरी जनावर यांना वनविभागाकडून ची आर्थिक मदत मिळावी यासाठी आम्ही शासन स्तरावर हा अहवाल पाठवू असे आश्वासन दिले परंतु अकोली शेत शिवारात बिबट्या घालत असलेल्या धुमाकूळ यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रब्बी हंगामाचे हरभरा यासारख्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री शेतात हजर राहावे लागते, परंतु बिबट्याच्या या धास्तीने बरेच शेतकरी रात्रपाळी टाळून दिवसात शेताला पाणी देत आहेत व आपले कामे आपण घराचा रस्ता धरत आहे. तरी या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस करून परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी खरी वर्गातून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या