ढाणकी प्रतिनिधी -
रस्ते हे देश विकासाचा दुवा आहे रस्त्यावरून देश ओळखला जातो असे म्हणतात मात्र ढाणकी ते खरूस खुर्द रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे.
ढाणकी वरून किनवट तसेच तेलंगणा राज्यात जाण्यासाठी हा रस्ता महत्वाचा आहे त्यामुळे या रस्तावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणात चालु असते मात्र रस्ता पूर्णपणे फुटला असल्याने वाहन धारकांना वाहन चालवणे अवघड झाले असून या मुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
बंदी भाग म्हणून ओळखला जाणाऱ पैनगंगा अभयारण्य हे याच भागात असून रस्त्यामुळे या भागाचा विकास खुंटला आहे. काही दिवसापूर्वी बंदी भागातील महिलेला दवाखान्यात आणताना खराब रस्त्यामुळे रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना ताजी असून तरीही कोणत्याही लोकप्रतिनिधी ला हा रस्ता सुधारावा वाटला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
नव्याने आमदार म्हणून निवडून आलेले नामदेव ससाणे सुद्धा रस्ता दुरुस्तीचे दिलेले वचन पूर्ण करू शकले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याच प्रमाणे खरूस खु. रोडवरील नाल्यावरील पूल सुद्धा खचला असून त्यामुळे सुद्धा अपघात होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
खरूस खू. वरून ढाणकी ला येणाऱ्या लोकांना सुद्धा या मुळे मोठी अडचण होत असून या गम्भीर बाबी कडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी या कडे दुर्लक्ष करत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चांबलवार तरी या कडे लक्ष देतील का ? असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. या रस्तांबाबत वारंवार तक्रारी देऊन ही हा रस्ता दुरुस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष असून त्वरित रस्ता न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

0 टिप्पण्या