ढाणकी प्रतिनिधी -
नांदेड जिल्हातील भोकर तालुक्यातील दिवशी येथील 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करत खून केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून ढाणकी शहर व्यापारी बांधवानी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवत भव्य स्वरूपात मूकमोर्चा आज दिनांक 27 जाने वारी काढण्यात आला. विशेष म्हणजे यात सर्व समाजबांधवांचा सहभाग होता.
दिवशी येथील घटना ही अमानवीय अशी असून 5 वर्षीय चिमुकली वर अत्याचार होतो ही मानव जातीला शोभणारी नाही. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून जो तो आपल्या परीने घटनेचा निषेध करत आहेत. ज्या प्रमाणे आंध्र प्रदेश मध्ये दिशा कायदा लागू असून 21 दिवसात बलात्कारातील आरोपी ला फाशी दिल्या जाते त्या प्रमाने महाराष्ट्रात सुद्धा कायदा लागू करण्याची या वेळी मागणी करण्यात आली.
ढाणकी येथे सकाळीच सर्व समाजबांधव हनुमान मंदिर परिसरात जमा होऊन काळ्या पट्ट्या बांधत आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली व शांततेत बाजारपेठेतुन मूक मोर्चा काढला. मोर्चा मध्ये गांजेगाव, ब्राह्मणगाव, सोईट इत्यादी गावातून सुद्धा नागरिकांनी, महिलांनी, चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता. मोर्चा शांततेत निघत जुने बस स्टॅन्ड येथे जमा होत युवती, महिलांनी निषेधपर भाषणे केली व अत्याचारित चिमुकली श्रद्धांजली वाहिली भाषण करतेवेळेस बोलताना एका युवतीने सांगितले की, जसे मुलं शिवाजी महाराजा प्रमाणे दाढी वाढवून, डोक्याला चंद्रकोर लावत फिरतात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगात घेत नाहीत आणि मुलींना वाईट नजरेने पाहतात हे जो पर्यंत बंद होत नाही तो पर्यंत मुली समाजात ताठ मानेने जगू शकणार नाहीत असे मनोगत व्यक्त केले , त्याच प्रमाणे आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावे जेणे करून असे प्रसंग घडणार नाही असे सुद्धा मनोगत व्यक्त करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


0 टिप्पण्या